Published On : Tue, Jul 17th, 2018

डॉ. आंबेडकरांनी राज्यघटना मनुस्मृती वाचून लिहिली : संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य

Advertisement

पुणे : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती वाचून राज्यघटना लिहिली, असं वादग्रस्तविधान श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले आहे. संभाजी भिडेंच्या या विधानामुळे नवा वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.

एका कार्यक्रमात बोलताना भिडे म्हणाले, ”डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनूचं कौतुक केलं होतं हा इतिहास आहे. राजस्थान विधानसभेच्या भवनाबाहेर मनूचा पुतळा उभा करण्यासाठी पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर गेले होते.

मनूचा जो पुतळा उभा करण्यात आला होता, त्या पुतळ्याखाली “मनू हा जगातला पहिला कायदेपंडित होता” असं बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः लिहिलं असा दावा भिडेंनी केला. तसंच संविधान देशासाठी अर्पण करताना, मी हे लिहिलं मनुस्मृतीचा अभ्यास करून लिहिलं असंही बाबासाहेब म्हणाले होते असा दावाही भिडेंनी केला आहे.

याशिवाय याचा पुरावाही मिळेल तो मीडियाने शोधून काढावा” असं भिडे म्हणाले. मनुने विश्वाच्या कल्याणासाठी ग्रंथ लिहिला. जपान सारखे राष्ट्र मनूला मानतं अनेक विदेशातील विद्यापीठात मनुस्मृतीचा अभ्यास करतात असा दावाही त्यांनी केला.