Published On : Tue, Sep 12th, 2017

नागपुर महानगर पालिकेची समाधी मनपा प्रशासनातील अधिकारी व् सत्ताधीश यांच्या समाध्या बांधण्यात आल्या

नागपुर: शहरातील मुख्य रस्त्यावर खड्डे आहे या साठी नागपुर लोकसभा युवक कांग्रेस ने नागपुर लोकसभा युवक कांग्रेस अध्यक्ष नगरसेवक बंटी बाबा शेळके यांच्या मार्गदर्शनात तसेच पूर्व नागपुर युवक कांग्रेस चे कार्याध्यक्ष अक्षय घाटोले यांच्या नेतृत्वात गंगाबाई घाट येथील खड्यांवर नागपुर महानगरपालिकेतील अधिकारी व् सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या समाध्या बांधण्यात आल्या.

नागपुर लोकसभा युवक कांग्रेस चे अध्यक्ष नगरसेवक बंटी शेळके यांच्या नेतृत्वात अनेक नगारानाद व् घंटानाद आंदोलन शहरात विविध ठिकाणी करण्यात आले,मनपा प्रशासनाला वेळो-वेळी निवेदन देवून आंदोलन करूँनहीं जाग आलेली नाही. करदात्या जनतेच्या प्रश्नांकडे सम्पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले त्यातच गंगाबाई घाट रोड मुख्य मार्गावर स्मार्ट सिटी मुख्य मार्ग नामकरण अशे घंटानाद आंदोलन केले,स्मार्ट सिटीच्या नावावर कोट्यावधीचा निधि उचलून ही शहर जसेच्या तशे आहे,या विरोधात युवक कांग्रेस ने यलगार पुकारूँनही प्रशासन जागे झाले नाही नंतर युवक कांग्रेस द्वारा गांधीगिरी करत अनोखे फ़ोन लगाओ आंदोलन केले व् त्या खड्यांवर फलक उभारून सहायक आयुक्त गांधीबाग झोन kr.६ च्या अधिकाऱ्याचा मोबाइल क्रमांक टाकण्यात आला.

हजारो करदात्या नागरिकांनी फलकावर दिलेल्या नंबर वर फ़ोन करूनही अधिकाऱ्या कडून ठण्ड प्रतिसाद मिळाला, व् अजूनही जीवघेणे खड्डे बुजविण्यात आलेले नाही.

नागपुर लोकसभा युवक कांग्रेस मनपाला चेतावनी देत आहे की आज मनपा ची समाधि गंगाबाई घाट रोड येथील जिव घेण्या खड्यावर बाँधनात आलेली आहे ७ दिवसात जर खड्डे बुझविले नाही तर शहरात जागो जागी पडलेल्या खड्यांवर अधिकारी व् सत्ताधीशांच्या समाध्या बांधण्यात येईल ,या उपरही मनपा च्या अधिकाऱ्यांना जाग आली नाही तर अधिकाऱ्यांना वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करूँ व् सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना शहरात फिरकु देणार नाही असा गर्भित इशारा नागपुर लोकसभा युवक कांग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक बंटी बाबा शेळके यांनी दिला.

आजचे आंदोलन पूर्व नागपुर युवक कांग्रेसचे कार्याध्यक्ष अक्षय घाटोले यांच्या नेतृत्वात करण्यात आले तसेच आन्दोलनामध्ये सोशल मीडिआ सेल चे अध्यक्ष हेमंत कातुरे,मध्य नागपुर युवक कांग्रेस चे अध्यक्ष स्वप्निल ढोके,प्रीतम वैरागड़े,निखिल बालगोटे,गोलू श्रीवास,निखिल चाणेकर,प्रतिक उज्जैनवार,ओमदीप झाड़े,फज़लुर कुरेशी,शेख अजहर,कार्तिक बोंद्रे,निखिल नंदनवार,बंटी सींग,नयन खंडेलवाल,वरुण पुरोहित,रामचंद्र नान्हे,सागर घोंगे,मयूर नागपुर,पियूष खड्गी,हनी सोनटक्के, ऋतिक चांदेकर,कौशिक झलके,विक्की नाटिये,राज बोकडे,पूजक मदने,आशीष लोनारकर,अनिकेत समुंद्रे,शिवम् जैस्वाल,रोशन पंचबुधे,हर्षल धुर्वे,शुभम मोटघरे,पलाश जगताप,पंकज सरटकर,गणेश दादूरे,हरिओम वंजारी,रेनॉल्ड जेरोम,सूरज चौकिकार,चेतन थूल,चंद्रप्रकाश मोहरूले पदाधिकारी कार्यकर्ते उपस्तिथ होते.