Published On : Tue, Sep 12th, 2017

फुटबॉल प्रचाररॅलीचे महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते उद्घाटन

Advertisement

नागपूर: महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभाग व क्रीडा विभागाच्यावतीने आयोजित फुटबॉल या खेळाचा प्रचार व्हावा यासाठी फुटबॉल प्रचार रॅलीचे आयोजन मंगळवारी (ता.१२) ला वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयात करण्यात आले होते. यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी फुटबॉल ला किक मारून रॅलीचे उद्घाटन केले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालिका डॉ. अंजली राहटगावकर, रॅलीच्या संयोजिका पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभागाच्या विभागप्रमुख डॉ.माधवी मार्डीकर प्रामुख्याने उपस्थित होत्या.

फुटबॉल या खेळाचा प्रचार महाराष्ट्रभर व्हावा यासाठी शासनाच्या क्रीडा विभागाद्वारे प्रचार मोहिम सुरू करण्यात आली आहे. १५ तारखेला महाराष्ट्र मिशन मिलीयन या कार्यक्रमाची जनजागृती व्हावी यासाठी या प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये विदर्भातील तीन शासकीय महाविद्यालयांच्या विद्यार्थांचा सहभाग होता. ही रॅलीचा प्रारंभ वसंतराव नाईक शासकीय कला व समाज महाविद्यालयातून झाला. व्हेरायटी चौक, महाराजबाग चौक मार्गे ही रॅली शासकीय विज्ञान महाविद्यालयात आली. येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

या रॅलीमध्ये वसंतराव नाईक शासकीय कला व समाज महाविद्यालय,विज्ञान संस्था, न्यायसहायक विज्ञान संस्थेचे विद्यार्थी सहभागी होते. रॅलीमध्ये न्यायसहायक विज्ञान संस्थेचे संचालक डॉ.जयराम खोब्रागडे, वंसतराव नाईक कला व समाज महाविद्यालयाचे संचालक डॉ. सुनेत्रा पाटील, विज्ञान संस्थेचे संचालक डॉ.आत्राम तसेच शासकीय महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षक, क्रीडाविभागाचे प्रमुख उपस्थित होते.