Published On : Fri, Apr 26th, 2024

सलमान खान गोळीबार प्रकरण; बंदूक पुरविणाऱ्या दोघांना पोलिसांच्या बेड्या

Advertisement

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर गोळीबारप्रकरणी हल्लेखोरांना बंदूक पुरविणाऱ्या बिश्नोई गॅंगच्या सदस्यासह दोघांना गुरुवारी अटक केली. सोनू सुभाष चंदर (३७) आणि अनुज थापन (३२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

गुरुवारी रात्री उशिराने पथक दोघांना घेवून मुंबईत दाखल झाले. आरोपींनी एकूण ४० काडतुसे पुरवली होती. त्यापैकी १६ काडतुसांचा शोध गुन्हे शाखेकडून घेण्यात येत आहे. चंदर आणि थापन दोघेही मोबाईल फोन द्वारे हल्लेखोरांच्या संपर्कात होते. त्यांना फ्लाईटने मुंबईत आणण्यात आले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या नेतृत्त्वात ही कारवाई करण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलच्या सांगण्यावरून सागर पाल आणि विकी गुप्ताने सलमान खानच्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर गोळीबार केला.

यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाच्या भादंवि कलम ३०७ यासह शस्त्र कायद्यान्वये गुन्हा नोंद आहे. गुन्हे शाखेने दोघांना अटक केल्यानंतर यात अनमोल बिश्नोईचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.