Advertisement
अकोला: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. आज विदर्भातील यवतमाळ,बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, या ठिकाणी तर मराठवाड्यात नांदेड, हिंगोली, परभणी या मतदारसंघात मतदान होत आहे.सर्वच लोकसभा मतदार संघात सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. अकोला मतदारसंघात पहिल्या दोन तासात ७.१७ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
उमेदवार प्रकाश आंबेडकर, अनुप धोत्रे, डॉ. अभय पाटील यांनी मतदान करून आपले कर्तव्य बजावले. अकोला लोकसभा मतदारसंघांमध्ये २०५६ केंद्रांवर मतदान सुरू झाले. याठिकाणी सकाळी ९ वाजेपर्यंत जिल्ह्यात ७.१७ टक्के मतदान झाले. अकोट विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ८.५ टक्के तर मूर्तिजापूर मतदारसंघात सर्वात कमी ६.०५ टक्के मतदान झाले आहे.