Published On : Thu, Oct 8th, 2020

‘सक्षम’ने आदिवासी, मागास भागात काम उभारावे : नितीन गडकरी

Advertisement

विश्व दृष्टी दिनाचा कार्यक्रम

नागपूर: ‘सक्षम’ या संघटनेचे काम म्हणजे सामाजिक सेवा आहे. सामाजिक सेवेचे व्रत घेऊन ही संस्था नेत्रदानाच्या क्षेत्रात काम करीत आहे. ‘सक्षम’ने आर्थिक, सामाजिक मागास असलेल्या भागात व आदिवासी क्षेत्रात आपल्या सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

Gold Rate
06Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,20,300 /-
Gold 22 KT ₹ 1,11,900 /-
Silver/Kg ₹ 1,48,700/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

‘सक्षम’तर्फे विश्व दृष्टी दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ना. गडकरी मार्गदर्शन करीत होते. याप्रसंगी सक्षमचे सर्व पदाधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सला उपस्थित होते. नेत्रहिनांची वाढती संख्या एक आव्हान असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- नेत्रदान करणारे आणि घेणारे यांच्या दरम्यान सेवा देणार्‍यांची संख्या वाढली पाहिजे. डोळे दान करता येतात पण दृष्टिकोन दान करता येत नाही, असे सांगून ते म्हणाले- देशातील 115 मागास जिल्हे व आदिवासी क्षेत्रात आजही आरोग्याच्या सेवा उपलब्ध नाहीत. अशा जिल्ह्यांमध्ये, गावांमध्ये सक्षमचे काम वाढले तर रोजगारही उपलब्ध होईल. डोळ्यांसंबंधीच्या प्राथमिक तक्रारींसाठी लोकांना मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज पडणार नाही.

‘सक्षम’च्या 40 ब्लड बँकांची संख्या 200 वर कशी नेता येईल, यासाठी शासनाकडे योजना बनवून दिली, तर शासनाच्या योजनेत मदत मिळू शकते. आदिवासी आणि मागास भागासाठी योजना तयार केली तर शासनाच्या त्या विभागातर्फे सवलतीही मिळू शकतात, त्यामुळे आपल्या कामाला अधिक गती मिळेल असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- या संस्थेचे काम ही समाजसेवा आहे. निस्पृह व नि:स्वार्थ भावनेने सक्षम समाजाची सेवा करीत आहे.

हे काम पुढे नेण्याची गरज आहे. यासाठी समाज या कार्याशी जुळत राहणार आहे. देशात नेत्रदानाचा कार्यक्रम एवढा मोठा व्हावा की, देशात नेत्रदान करण्याची आवश्यकताच राहणार नाही आणि आमचे उद्दिष्ट पूर्ण होईल. समर्पित भावनेने काम करणारी ही संस्था असल्याचेही ना. गडकरी यांनी शेवटी म्हटले.

या व्हिडिओ कॉन्फरन्सला सक्षचे अध्यक्ष दयालसिंग पवार, सचिव कमलाकांत पांडे, सहसचिव उमेश अंधारे, डॉ. संतोष, डॉ. शालिनी मोहन, पवन तापस, संघटनमंत्री डॉ. सुकुमारजी आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement