Published On : Thu, Oct 8th, 2020

महावितरण कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी

Advertisement

नागपूर: कोरोनासारख्या विषाणूचा प्रादुर्भाव अजून संपुष्ठात आला नसताना शहरातील वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांची महानगरपालिकेच्या वतीने कोरोना चाचणी घेण्यात आली.

महावितरणच्या तुकडोजी पुतळा चौकातील मानेवाडा आणि सुभेदार ले आऊट उपविभागात कार्यरत अधिकारी, कर्मचारी आणि जानमित्रांची कोरोना चाचणी कार्यालयाच्या परिसरात घेण्यात आली. दिवसभरात एकूण ८७ जणाची चाचणी घेण्यात आली.हे अहवाल येत्या २ दिवसात मिळणार आहे. जनतेला सेवा देतेवेळी अडचण येऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणकडून या चाचण्या घेण्यात आल्या.

Gold Rate
08 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700/-
Silver/Kg 1,08,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महानगरपालिकेच्या वतीने डॉ. बकुळ चौधरी,नगरसेविका मंगला खेकरे यांनी मदत केली. महावितरणच्या महाल विभागाचे कार्यकारी अभियंता समीर टेकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानेवाडा उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता मुकेश चौधरी, सुभेदार ले आऊट उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता मंगेश कहाळे, सहायक अभियंता अल्पेश चव्हाण, श्रीरंग मुट्टेवार, तुषार मेंढे, तांत्रिक कर्मचारी संदीप वंजारी, चंदू गायधने, ऋषिकेश पिंजरकर, सुधीर चौधरी यांनी या चाचण्या यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.

Advertisement
Advertisement