Published On : Sat, Dec 4th, 2021

सक्करदरा-3 जलकुंभाची डिसेंबर 6 ला, रेशीमबाग जलकुंभ -७ ला आणि वंजारी नगर (नवीन) जलकुंभ -डिसेंबर ८ ला स्वच्छता

मनपा-OCW वार्षिक जलकुंभ स्वच्छता मोहीम…

नागपूर : नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी आपल्या स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या वचनबद्धता अनुसरत दरवर्षीप्रमाणे यंदाही जलकुंभ स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. मनपा-OCW दरवर्षीच नागपुरातील सर्व जलकुंभ वर्षातून एकदा स्वच्छता करीत असते. हि परंपरा मनपा-OCW ने २०१२ पासून नित्यनियमाने सुरु केलेली आहे. *नेहरू नगर झोन अंतर्गत .. सक्करदरा-3 जलकुंभ डिसेंबर 6 ला (सोमवारी) तसेच धंतोली झोन अंतर्गत रेशीमबाग जलकुंभ -७ (मंगळवारी) आणि वंजारी नगर (नवीन) जलकुंभ -डिसेंबर ८ ला स्वच्छता करण्यात येतील* जलकुंभ सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान स्वच्छ करण्यात येतील. या जलकुंभ स्वच्छतेमुळे तेथील भागात पाणीपुरवठा बाधित राहील.

Advertisement

ह्या जलकुंभ स्वच्छता शटडाऊन दरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने मनपा-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

६ डिसेंबर (सोमवारी ) रोजी सक्करदरा -३ जलकुंभावरून पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग:
सक्करदरा -३ : गुरुदेव नगर, संजय गांधी नगर, रुक्मिणी नगर, आणि श्री राम नगर

७ डिसेंबर (मंगळवारी ) रोजी रेशीमबाग जलकुंभावरून पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग:
रेशीमबाग जलकुंभ: जुनी शुक्रवारी, गणेश नगर, महावीर नगर, गायत्री नगर , नवीन नंदनवन , जुने नंदनवन, भागात कॉलोनी, शिव नगर, आझाद चौक , तिरंगा चौक, आनंद नगर, ओम नगर, सुदामपुरी, लभान तांडा, नेहरू नगर, सक्करदरा पोलीस स्टेशन,

८ डिसेंबर (बुधवारी ) रोजी वंजारी नगर (नवीन) जलकुंभावरून पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग:
वंजारी नगर (नवीन) जलकुंभ: सोमवारी वसाहत, रघुजी नगर, पोलीस वसाहत, म्हाडा वसाहत, आदिवासी कॉलोनी, तुकडोजी नगर, विश्वकर्मा नगर, ताज नगर, बजरंग नगर, बोधिवृक्ष नगर सावित्रीबाई फुले नगर, आयुर्वेदिक ले आउट आणि इतर भाग .

Advertisement
Advertisement
Advertisement