Published On : Thu, Mar 12th, 2020

संत तुकाराम बीज जिजाऊ ब्रिगेड व महिला भजन मंडळ व्दारे संपन्न

कन्हान : – संत तुकाराम मंदीर, तुकाराम नगर कन्हान येथे जिजाऊ ब्रिगेड कन्हान व महिला भजन मंडळा व्दारे भजनाचा कार्यक्रम करून जगतगुरू संत तुकाराम महाराजाना विन्रम अभिवादन करून बीज कार्यक्रम संपन्न झाला.

बुधवार (दि.११) ला जगतगुरू संत तुकाराम महाराज बीज निमित्य संत तुकाराम मंदीर, तुकाराम नगर कन्हान येथे जिजाऊ ब्रिगेड कन्हान व महिला भजन मंडळ कन्हान व्दारे भजनाचा कार्यक्रम करून जगतगुरू संत तुकाराम महाराजांना विन्रम अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा मायाताई इंगोले, सचिव छायाताई नाईक, अल्काताई कोल्हे, सुनिताताई ईखार, नगरसेविका अनिताताई पाटील, प्रमिला ताई मते, शोभाताई केने, कमल गोतमारे, पुष्पाताई घोडकी, लताबाई जळते, रंजनाताई इंगोले, वर्षा जुळे, गोदावरी नागरे, सुषमा बांते, मिनाक्षी भोयर, सुनंदा दिवटे, उज्वला लोंखडे तसेच महिला भजन मंडळाच्या चंद्रभागा रेवतकर, शकुंतला डोणारकर, कुसुम ठवकर, लक्ष्मीबाई गडे, पुष्पा खर्चे, सुनंदा कडुकर, माला नवघरे, बेबीताई येरपुडे, कुसुम जामोदकर, लता मेहर, मीरा पांडे, लता मोंढे, मंदा राणे, विमल चिंचुलकर, शशीकला बावने, चन्ने बाई, नयना मनघटे आदीने प्रामुख्याने उपस्थित राहुन संत तुकाराम महाराजां च्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.