Published On : Mon, Sep 16th, 2019

साईबाबा आश्रमशाळा टेकाडी संघ जिल्हा व्हॉलीबॉल स्पर्धेत विजयी

कन्हान : – साईबाबा आश्रमशाळा टेकाडी येथील व्हॉलीबॉल संघाने जिल्हा स्तरीय १४ वर्षीय व्हॉलीबॉल स्पर्धेत विजय मिळवुन वर्धा येथे होणाऱ्या विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रवेश निश्चित केल्याने संघाचे खेडाळु यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या पंचायत क्रिडा व युवक सेवा संचनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर यांच्या मार्फत जिल्हा स्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात व्हॉलीबॉल खेळात पारशिवनी तालुक्यातील साईबाबा आश्रमशाळा टेकाडी संघाने श्री. प्रफुल्ल बालपांडे यांच्या मार्गदर्शनात व्हॉलीबॉल संघाने नागपूर जिल्ह्य़ाच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत कामठी, काटोल व अंतिम सामन्यात नागपूर ग्रामीण च्या संघाचा दणदणीत पराभव करून वर्धा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेकरिता प्रवेश निश्चित केला. या विजया बद्दल संघाचे साईबाबा आश्रमशाळा टेकाडी चे संचालक तथा महानगरपालिकेचे नगरसेवक श्री किशोरजी वानखेडे व मुख्याध्यापक (माध्यमिक) संजय काळे, मुख्याध्यापक (प्राथमिक) श्री राजेश खोरे आणि शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी संघाचे खेडाळु यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.