Published On : Mon, Sep 16th, 2019

डॅगन पॅलेस टेम्पलच्या महादानदात्या मॅडम नोरीको ओगावा (जपान) यांच्या स्मृती पित्यर्थ डॅगन पॅलेस टेम्पल येथे महापरित्राणपाठ संपन्न

Advertisement

शोकाकुल वातावरणात महाउपासिका मॅडम नोरीको ओगावा यांना आदरांजली पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे व ऍड. सुलेखाताई कुंभारे यांची विशेष उपस्थिती.

कामठी :-विश्वविख्यात डॅगन पॅलेस टेम्पल कामठी येथे महाउपासिका मॅडम नोरीको ओगावा यांच्या स्मृतीस अभिवादन करण्याकरिता रविवार दिनांक 15 सप्टेंबर 2019 रोजी भदंत ज्ञानज्योती महाथेरो (संघनायक) व भिक्षुसंघाच्या वतीने महापरित्राणपाठ संपन्न झाले.

महाउपासिका व ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या महादानदात्या मॅडम नोरीको ओगावा यांचे दीर्घकाळ आजारानंतर जपान येथे 2 सप्टेंबर 2019 रोजी दुखःद
निधन -झाले. मॅडम नोरीको ओगावा यांच्या पार्थिव देहावर रविवार दिनांक 8 सप्टेंबर 2019 रोजी जपान येथील याहा हाता संजो येथे जपानी बौध्द पध्दतीने अंतीम संस्कार करण्यात आले. या वेळी अॅड. सुलेखाताई कुंभारे हया मॅडम नोरीको ओगावा यांच्या अंतिम विधी ला उपस्थित होत्या.

भदंत ज्ञानज्योती महाथेरो (संघनायक), भदंत मेथ्थानंद व भिक्षु संघ यांनी महापरित्राणपाठ प्रसंगी विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे धम्मपुजा,
धम्मदेसना व धम्मविचाराप्रति उपदेश दिले. यानंतर मॅडम नोरीको ओगावा यांच्या प्रतिमेला माल्यापर्ण करून श्रध्दांजली वाहली. या वेळी महाराष्ट्राचे उर्जामंत्री व नागपूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे व ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा अॅड. सुलेखाताई कुंभारे यांनी सुध्दा मॅडम नोरीको ओगावा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून श्रध्दांजली वाहीली.

पुज्य भिक्षु संघाच्या उपस्थितीत मॅडम नोरीको ओगावा यांच्या स्मृतिला अभिवादन करण्याकरिता आयोजित महापरित्राणपाठ मुळे संपूर्ण परिसर धम्मपूर्ण
वातावरणाने भारावून गेला होता. या वेळी मोठया संख्येने बौध्द उपासक -ंउपासीकांनी महापरित्राणपाठ ला उपस्थित राहून धम्म देसना ग्रहण केली.

महापरित्राणपाठाच्या प्रसंगी अजयभाऊ कदम, उदास बन्सोड, दिपंकर गणविर, दिपक सीरीया, सुभाष सोमकुवर, मुस्ताक अली, अशपाक कुरेशी, विष्णु ठवरे, विवके मंगताणी, लाला खंडेलवाल, मनीष वाजपेयी, राजेश दुबे, राजेश शर्मा, बबलु तिवारी, हुकुमचंद आमधरे, बाबा महल्ले, डाॅ. राजेंद्र अग्रवाल, सुनिल पाटील, लालसिंग यादव, कपील गायधने, भीमराव फुसे, अशोक नगरारे, राजेश नानवटकर, सुरेश पाटील, विजय दहीकर, नरेंद्र चव्हाण, मनोहर गणविर, राजु भागवत, शरद राहाटे, विकास रंगारी, मनीष मेंढे-, राजेश गजभिये, अमित चव्हाण, राजेश शंभरकर, दिपक डांगे, सुनिल वानखेडे, चंदु कापसे, महेंद्र मेंढे,, सागर भावे,शुभम रंगारी, अमोल मेश्राम, सुकेशीनीताई मुरारकर, वंदना भगत, नंदाताई गोडघाटे, रत्नमालाताई मेश्राम, रजनी लिंगायत, सावला सिंगाडे, सीमा सोमकुवर,समरीत पंचभाई, विशाखा गेडाम, यांनी श्रध्दांजली अर्पण केली. या वेळी मोठया संख्येने उपासक – उपासिका यांची उपस्थिती होती.

संदीप कांबळे कामठी