Published On : Mon, Sep 16th, 2019

भीम चौक ते भांडेवाडी रिंग रोडवरील वाहतूक बंद

मनपा आयुक्तांचे आदेश : सीमेंट रस्ता बांधकामामुळे १५ नोव्‍हेंबरपर्यंत उजव्या बाजुने दुतर्फा वाहतूक

नागपूर : शहरात सुरू असलेल्या विकास कामांतर्गत सीमेंट काँक्रीट रस्ते बांधकामादरम्यान शहरातील भीम चौक ते भांडेवाडी रिंग रोड दरम्यान डावीकडील मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

सीमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा-३ मध्ये रस्ता क्रमांक ११ भीम चौक ते भांडेवाडी रिंग रोड दरम्यान सीमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील डाव्या बाजूची वाहतूक १५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत बंद राहील.

या मार्गावरील वाहतूक उजव्या बाजुने दुतर्फा राहील तर इतर वाहतूक अंतर्गत रस्त्यावरून वळविण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. सदरबाबतचे लेखी आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले आहेत.