Published On : Tue, Jan 28th, 2020

रामटेक येथे साई इंटरनॅशनल कॉन्व्हेन्ट प्रजासत्ताक दीन उत्साहात साजरा

देशभक्ती पर गाणे, भाषण, नाटक, व नृत्य सादर करून उपस्थितांची जिंकली मने

रामटेक– रामटेक येथे साई इंटरनॅशनल कॉन्व्हेन्ट मधे ७१ वा प्रजासत्ताक दीन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष नानोटे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्या सौ शोभा झाडे यांच्या हस्ते विद्येची देवी माता सरस्वती , राष्ट्रपिता महात्मा गांधी, आणि सविधनाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबडकर यांच्या प्रतिमेला माल्यारपण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ ओजस्विनी अहिरकर मॅडम यांनी केले.


विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर गाणे, भाषण, नाटक, व नृत्य सादर करून प्रेक्षकांचे मन मोहून टाकले. उपस्थितांनी देशाच्या रक्षना करीता प्राणाची आहुती देणाऱ्या शहिदांना सलामी दिली. स्कूलमध्ये घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देवून गैरवण्यात आले. त्याचप्रमाणे.

शाळेतील उत्कृष्ठ शिक्षिका म्हणून सौ वर्षा महाजन व सौ ओजास्विनी अहिरकर मॅडम यांना मानचिन्ह देवून गौरव न्यात आले. विद्यार्थ्यांना आपले व्यक्तित्त्व घडविताना साई इंटरनॅशनल स्कूल कॉन्व्हेन्ट सदैव मदत करेल अशी गवाही शाळेचे मुख्याध्यापक महेश नांदेकर सर यांनी दिली.

कार्यक्रमाचा शेवटी शाळेच्या इन्चार्ज सौ संगीता वैद्य मॅडम यांच्या हस्ते विद्यार्थाना व पालकांना मिठाई वाटप केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ सोनम कोठे मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता संगीत टीचर आशिष हटवार , डान्स टीचर नेहाल बिसमोगरे सर रुचिता बिसेन ,तपस्या ठाकूर, रोशनी मलेवार, शिल्पा हारोडे, निकिता ठाकरे, प्रिया अतकरे, किरण मिश्रा, रिता कुजरेकर, ममता मेहेर यांनी परिश्रम घेतले.