Published On : Sat, Dec 22nd, 2018

संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी पिपरी-कन्हान ला साजरी

Advertisement

कन्हान : – संत गाडगेबाबा यांच्या ६२ व्या पुण्यतिथी निमित्त पिपरी-कन्हान येथील रमाई मागासवर्गीय बहुउद्देशीय शिक्षण संस्था व्दारे अभिवादन करून व स्वच्छता अभियान राबवुन पुण्यतिथी साजरी करण्यात आली .

रमाई मागासवर्गीय बहुउद्देशीय शिक्षण संस्था कन्हान च्या कार्यालयात संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला सामाजिक कार्यकर्ता संदीप शेंडे यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले .

Gold Rate
29 April 2025
Gold 24 KT 96,200/-
Gold 22 KT 89,500/-
Silver / Kg 97,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

संत गाडगेबाबा यांच्या गाव स्वच्छता विषयी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करून रमाई संस्था कार्यालयाच्या परिसरात स्वच्छता अभियान राबवुन आजुबाजुचा परिसर स्वच्छ करण्यात आला . याप्रसंगी प्रामुख्याने चंद्रशेखर शेंडे , शुभांगी पानतावने, प्रमोद सहारे, चेतन वाघमारे, अनीता पानतावने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अंकित पानतावने यांनी तर आभार संघपाल शेंडे यांनी व्यकत केले .

Advertisement
Advertisement