Published On : Sat, Jan 27th, 2018

व्यसनमुक्तीमुळेच समाजाचे भविष्य सुरक्षित : पालकमंत्री

Advertisement


नागपूर: व्यसनमुक्तीमुळेच देशातील सर्व समाजाचे भविष्य सुरक्षित राहणार असून परमात्मा एक सेवक मंडळाचे व्यसनमुक्तीसह अन्य प्रकारचे सामाजिक कार्य हे समाजहिताचे कार्य असून मंडळामुळे लाखो कुटुंब व्यसनमुक्त झाले आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले.

मौदा तालुक्यातील पावडदौना येथे शुक्रवारी परमात्मा एक सेवक मंडळाचे हवन कार्य, झेेंडा वंदन व सेवकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात लाखो सेवकांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री बावनकुळे बोलत होते. या प्रसंगी खा. कृपाल तुमाने, जि.प.अध्यक्ष निशा सावरकर, आ. सुनील केदार, आ. आशिष देशमुख, माजी आ. नरेंद्र बोंडकर, परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष राजू मदनकर, उपाध्यक्ष वैरागडे, सचिव क्षीरसागर, सहसचिव दिवटे, कोषाध्यक्ष फकीरचंद वैद्य, संचालक बालाजी नंदनकर, युवराज वैद्य, मनोहर देशमुख, तापेश्वर वैद्य, नरेश मोटघरे, आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात होमहवन तसेच सत्संग, अंधश्रध्दा निर्मूलन, दारुमुक्ती, व्यसनमुक्ती, स्त्री भ्रूणहत्या, महिलांवरील अत्याचार या विषयावर चर्चात्र घेण्यात आले. सुमारे 7 ते 8 लाख सेवक या ठिकाणी एकत्र जमले होते. सकाळपासून सुरु झालेला हा मेळावा सायंकाळपर्यंत सुरु होता.