नागपूर: एन.ए.एफ.एस. फायर-सेफ्टी कॉलेज कॅम्पस मध्ये २६ जानेवारी २०१८ रोजी गणतंत्र दिवस साजरा करण्यात आला. अॅकेडमीचे अध्यक्ष सुशांतकुमार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात गणतंत्र दिवसाचे महत्व जवानांना पटवून दिले. जवळपास 200 फायर-सेफ्टी जवानांनी सुरक्षेची शपथ घेऊन राष्ट्रीय मानवंदना दिली व विविध कवायती सादर केल्या.
जवानांनी सादर केलेला मानवी भारतीय नकाशा व विविध राज्यांच्या झाकी हा आर्कषणाचा विषय होता. हा भव्य कार्यक्रम एन.ए.एफ.एस. चे अध्यक्ष सुशांतकुमार सर यांच्या मार्गदर्शनात कमांडर नमन नलवाया व पृथ्वी रामटेके यांनी पार पाडला. या कार्यक्रमात प्राचार्य अंजली मेश्राम व अॅकेडमीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.