Published On : Sat, Dec 22nd, 2018

श्री सिद्ध नारायण टेकड़ी,अंबाला रामटेक येथे सदगुरू पुण्यतिथि महोत्सव उत्साहात सुरू

ओम नमो नारायण ह्या जप ने परिसर भक्तिमय

रामटेक : रामटेक तिर्थक्षेत्र ही संतांची व दैवी परंपरा लाभलेली भूमी आहे. येथे श्री सद्गुरु नारायण स्वामी महाराज यांची ५०० वर्ष पुरातन समाधि ही आज सार्वांन्ना संजीवनी देत आहे.या निमित्य श्री दत्तगुरु बालयोगी छोटू बाबा पुण्यतिथि महोत्सव तसेच अखंड नमस्मरण जप 9 दिवसीय कार्यक्रम दि. १८ डिसेंबर पासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली २६ डिसेंबर पर्यंत सुश्री साध्वी वन्दनाजी ताई महाराज याच्या मार्गदर्शना मधे हा कार्यक्रम मोठ्या हर्षोल्लासात संप्पन होत आहे। दरवर्षी प्रमाने ह्या वर्षी सुद्धा हा उत्सव खुप मोठ्या आनंदात साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाची भक्तांना नेहमी उत्सुकता आसते.

दि.१८ डिसेंबर २०१८ ला दीप प्रज्वलन व अखंड नामजाप आणि महाभिषेक करूनच कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. दरवर्षी येत्या भक्तांना प्रसाद मिडतो व हे अन्नसत्र निरंतर सुरु राहत असते.संपूर्ण भारतातून भक्तगण मोठ्या संख्येने येतात व आपला पूर्ण वेळ महाराजच्या सेवेत अर्पण करतात.


नारायण टेकडी ला चहूबाजूंनी विकसित करण्याचे श्रेय श्री दत्तगुरु बालयोगी छोटू बाबा यांना आहे. छोटूबाबांनी नारायण टेकडी परिसर नवचैतन्य इतका भारुन टाकला की प्रांतीय व दूर दूरच्या गावावरुन येणारे परप्रांतीय भक्तगण येथे ९ ही दिवस या समासत्रामध्ये वाहून जातात. त्या मुळेच काय कि, श्रेष्ठ संत तुकड़ोजी महाराज , योगिराज स्वामी सितारामदासजी महाराज , माताजी गौरीशंकर महाराज , संत दामोदरदासजी महाराज इत्यादिंनी परमेश्वराच्या प्राप्ति साठी हेच स्थान निवडले होते. या अनेक संत महानुभावांनी समाधि साधने साठी नैसर्गिक स्वौऊंदर्याने परिपूर्ण प्रभु रामचंद्र यांचे मंदिर आणि नागार्जुन स्वामी यांचे मंदिर यांचा मधिल पर्वतावर एकांतवास तप करुन आपले जीवन धन्य करुण घेतले.

त्याच प्रमाने महाराष्ट्रचा कानाकोपर्यातुन व परप्रांतातुन येनारे भक्त तपोभूमिला भेट देऊन संत महात्म्यांचा सनिद्यात स्वताला तेजोमय व गौरवांकित करुण घेतात. महाराष्ट्र , मध्यप्रदेश , छत्तिसगढ़ मधिल भक्तगण यायला सुरुवात झाली आहे. कुणी भक्तगण ऑफिस ला सुट्या घेऊन तर कुणी व्यवसायातून वेळ काढून तन मन एकाग्र करून मनोभावे शांत चित्ताने ओम नमो नारायण हा जप करून सारी परिसर भक्तिमय झालेला आहे. रामटेक मधिल सिद्ध सद्गुरु छोटूबाबा यांचे शिष्य, तन, मन धनाने कार्यक्रम सफल करित आहेत.

कार्यक्रमाची सांगता दि. २६ डिसेंबर २०१८ ला होइल. ह्या समारोपिय कार्यक्रम गुरुकुंज मोझरी (अमरावती) येथिल तुकडोजी महराजांचे परमशिष्य श्री प्रकाश महाराज बाघ यांच्या किर्तनातुन भक्तांना उपदेश करून परमसुखाचा आनंद देतील. त्यामुळे श्री सिद्ध नारायण टेकडी , अंबाला रामटेक येथिल ९ दिवसीय भक्तिमय रसवाद ग्रहण करावा असे आवाहन सेवा मंडळाने केले आहे

‘संत आले आपल्या घरा, तोची दिवाळी दसरा’ ह्या म्हणीप्रमाने नारायण टेकडी वर आनंद व हर्षोल्लासाचे वातावरण बघायला मिळत आहे.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व भक्तगण सहकार्य करीत आहे .