Published On : Sat, Dec 22nd, 2018

सी एम चषक महोत्सवाचा कांद्री ला बक्षीस वितरणासह समारोप

Advertisement

कन्हान : – आमदार डी एम रेड्डी व भारतीय जनता युवा मोर्चा रामटेक व्दारे सी एम चषक क्रिडा व कला महोत्सवाचा कांद्री येथे बक्षीस वितरण सोहळ्यासह थाटात समारोप करण्यात आला.

सी एम चषक देशातील सर्वात मोठा क्रिडा व कला महोत्सव ३ डिसेंबर ते १६ डिसेंबर पर्यंत रामटेक विधानसभा परिसरात आयोजित करण्यात आला . या कार्यक्रमाचे सायंकाळी ६ वाजता जि प शाळा कांद्री (कन्हान) येथे उजाला गायन स्पर्धा व उज्वला नुत्य स्पर्धाचे बक्षीस वितरणासह समारोपिय सोहळ्याचे मा. डि मल्लिकार्जुन रेड्डी आमदार रामटेक विधानसभा यांच्या शुभ हस्ते व मा.शरदजी डोणेकर उपाध्यक्ष जि प नागपूर यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. मुख्य आकर्षण मिस इंडिया आलिशा यादव विजेता मिस इंडिया ग्लोबल इंटरनॅशनल २०१८ या होत्या.

या कार्यक्रमाला प्रामुख्याने भाजपा ना.जि.प्र.प्रमुख विकास तोतडे, भाजपा ना.जि. उपाध्यक्ष संजय मूलमुले, डॉ.राजेश ठाकरे, शंकरराव चहांदे नगराध्यक्ष कन्हान- पिपरी, डॉ.मनोहर पाठक उपाध्यक्ष, रामभाऊ दिवटे महामंत्री भाजपा ओ. बी.सी.मोर्चा ना जि, जयराम मेहरकुळे अध्यक्ष भाजपा पारशिवनी तालुका, ज्ञानेश्वर ढोक अध्यक्ष भाजपा रामटेक तालुका, विकास मेश्राम महामंत्री भाजपा पारशिवनी तालुका , वेंकटेश कारेमोरे माजी जि प सदस्य, हिरालाल गुप्ता आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजयुमो ना जि सहप्रसिद्धी प्रमुख सौरभ पोटभरे व अभिमन खराबे यांनी संयुक्तरित्या केले. तर आभार प्रदर्शन सी एम चषक उज्वला नृत्य स्पर्धा संयोजक विनोद कोहळे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता महामंत्री भाजयुमो ना जि व सी एम चषक अभियान संयोजक अतुल हजारे, भाजयुमो पारशिवनी तालुका अध्यक्ष महेंद्र साबरे, सह संयोजक राहुल किरपान, अालोक मानकर, मनोज कुरडकर, सौरभ पोटभरे , महादेवजी किरपान, रानु शाही, राजेंद्र शेंदरे, संजयजी बिसमोगरे, धनराजजी कारेमोरे, शिवाजी चकोले, अरुणा हजारे, अरुणा पोहरकर, विभा पोटभरे, राजेश पोटभरे, संकेत चकोले, लोकेश अंबाडकर, रोहित चकोले, आकाश कापसे, वीर सिंह, संदीप कभे , चंदन मेश्राम, आंनद शर्मा , मयुर माटे, कु. स्वीटी पोहणकर, नितेश कांबळे, गणेश किरपान, अमरदिप कापसे, शैलेश हिंगे, बॉबी यादव, प्रफुल हजारे, आदित्य मुळे, किरण चकोले, गणेश ठाकरे, प्रवीण आखरे, अक्षय पोहरकर व पदाधिकारी, कार्यक्रत्यांनी परिश्रम घेतले . कार्यक्रमास सर्व भारतीय जनता पार्टी , भारतीय जनता युवा मोर्चा, भाजपा महिला आघाडीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते,बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख व गावकरी बंधू भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थितीत होऊन लाभ घेतला .