Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Feb 22nd, 2021

  शेतकरी आंदोलनात मृत्यू पावलेल्या भगिनीचे बलिदान व्यर्थ जाणार नाही- केदार

  नागपुर – देशातील तुघलकी कारभाराकरिता कुख्यात केंद्रातील भाजप शासनाने शेतकरी विरोधी कायदे केल्याने समस्त देशातील शेतकरी हवालदिल झाला आहे. समस्त शेतकरी वर्गाच्या विरोधात असणाऱ्या या कायद्यांच्या विरोधात असणाऱ्या या कायद्यांच्या विरोधात देशातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर मागील ३ महिन्यांपासून आपल्या हक्काच्या मागण्यांकरिता व शेतकरी विरोधी काळ्या कायद्याच्या विरोधात सैवधानिक मार्गाने आंदोलन करीत आहे.

  परंतु सत्तेत मस्त असणाऱ्या केंद्र शासनाला मात्र तिळमात्र चिंता नाही. दिल्लीतील जीवघेना गारवा, अवकाळी पाऊस याची पर्वा न करता आंदोलनकारी शेतकरी मात्र दिल्ली सीमेवर दटून आहे. या आंदोलनादरम्याण मात्र जवळपास १०० शेतकऱ्यांनि आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यामुळे समस्त देशाच्या समस्त राज्यातील शेतकरी वर्ग हा या आंदोलनाला पाठिंबा देत असताना एका महाराष्ट्राच्या भगिणीचा सुद्धा मृत्यू झाला.

  महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हयातील अक्कलकुवा तालुक्यातील अंबाबारी गावातील स्व. सीताबाई रामदास तडवी या भगिनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याकरीता दिल्ली येथे जात असता जयपूर येथे प्रकृती खालावल्याने त्यांना आपले प्राण गमवावे लागले.
  याच स्व. सीताबाई रामदास तडवी यांचे नंदुरबार जिल्ह्यातील अंबाबारी गावातील निवास्थानी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास,क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांत्वना भेट दिली.

  मी स्वतः शेतकरी कुटुंबातील शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच्या वेदना जाणतो व शेती व शेतकरी यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या स्व. सीताबाई सारख्या भगिणीमुळे या देशातील शेतकरी सक्षमपणे उभा राहील असे उद्गार मंत्री सुनील केदार यांनी काढले. स्व. सीताबाई तडवी यांच्या बलिदानाला नमन करणेकरिता व त्या मायमाउलीच्या कार्यापुढे नतमस्तक होण्याकरिता आपण या ठिकाणी आलो असल्याचे सुनील केदार यांणी सांगितले.

  स्व. सीताबाई रामदार तडवी यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. त्यांच्या बलिदानामुळे शेतकऱ्यांना लढण्याची प्रेरणा मिळेल व स्व. सीताबाई तडवी यांच्या बलिदानाला नमन करत त्यांच्या कुटुंबियांना बकरिपालन केंद्र ( गॉट फॉर्म) देण्याची घोषणा मंत्री सुनील केदार यांनी केली. शेतकरी कुटुंबियांच्या पाठीशी महाविकास आघाडीचे हे शासन सदैव उभे असल्याचे वक्तव्य मंत्री सुनील केदार यांनी केले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145