Published On : Mon, Feb 22nd, 2021

भाकंस संस्थेचा कमर्शिअल न्यायालयाचा प्रस्ताव

– केंद्रिय मंत्री नितीन गडकरींशी चर्चा,विद्यार्थां होताहेत आत्मनिर्भर

नागपूर: अलिकडे न्यायालयावरील भार वाढत आहे. अनेक प्रकरण प्रलंबित आहेत. न्यायालयावरील वाढता भार कमी करण्यासाठी कमर्शिअल कोर्टची संकल्पना भारतीय कंपनी सचिव संस्थेच्या पदाधिकाèयांनी मांडली. या विषयी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून कमर्शिअल न्यायालयासंर्भातील सविस्तर चर्चा करून याविषयीचे महत्व पटवून दिले. विशेष म्हणजे ना. गडकरी यांनी सुध्दा सकारात्मकता दर्शविली. अशी माहिती भारतीय कंपनी सचिव संस्थेचे अध्यक्ष नागेंद्र राव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Advertisement

भाकंस संस्थेचे शिक्षण व प्रशिक्षणाविषयी सांगताना राव म्हणाले अलिकडे केंद्र सरकारकडून सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाला चालना मिळत आहे. मोठ्या प्रमाणावर सुशिक्षित आत्मनिर्भर होत आहेत. सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगासंबधी प्रकरणे हाताळण्यासाठी कमर्शिअल न्यायालयाची गरज आहे. न्यायालच्या पॅनलवर कंपनी सेक्रेटरींची नियुक्ती करता येईल. त्यांच्या माध्यमातून प्रकरण हाताळणे सोयीचे होईल. यामाध्यमातून भारतीय कंपनी सचिव संस्थेच्या विद्याथ्र्यांना रोजगाराची संधी उपलब्ध्दा होईल, असेही त्यांनी सांगितले.

या संस्थेनी आता पर्यंत देशभरातील ५५ विद्यापीठाशी करार करून कंपनी सेक्रेटरीचे साहित्य त्यांच्या वाचनालयात उपलब्ध करून दिले. सोमवारी कविकुलगुरू कालीदास संस्कृती विद्यापीठाशी करार करण्यात येणार आहे. करारानुसार विद्यापीठाच्या वाचनालयात शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देतील. नोंदणीकृत विद्याथ्र्यांना कंपनी सचिव संस्थचे शिक्षण घेता येईल. देशभरात या संस्थेचे ६५ हजार सदस्य तर साडेतीन लाख विद्याथ्र्यांची नोंदणी आहे. नोंदणीकृत विद्याथ्र्यांसाठी आधी १५ महिण्याचे प्रशिक्षण होते. आता वाढवून २१ महिण्यांचे करण्यात आले आहे. याशिवाय संस्थत ६० दिवसांचे प्रॅक्टीकलही देण्यात येतात. प्रशिक्षण घेतल्यानंतर विद्याथ्र्यांना थेट कंपनीत सेक्रेटरी म्हणून काम करता येतो. हा कोर्स पूर्णत व्यावसायिक असून आत्मनिर्भर बनविण्यास मदत करतो. ग्रामीण भागातील विद्याथ्र्यांपर्यंत कंपनी सचिव संस्थेची माहिती व्हावी यासाठी हा प्रयत्न असल्याचेही राव म्हणाले. पत्रपरिषदेला संस्थेचे उपाध्यक्ष देवेंद्र देशपांडे, तुषार पहाडे, सचिव रश्मी मीटकरी, खुशबू पसारी उपस्थित होत्या.

कोविड काळात सकारात्मकता
कोविड काळात सकारात्मकता कायम राहावी यासाठी संस्थेचे सदस्य आणि विद्याथ्र्यांसाठी विविध कार्यक्रम राबविण्यात आले. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय लोकांच्या मुलाखती ऑनलाईन सादर करण्यात आल्या. यामाध्यमातून प्रेरणादायी विचार पोहोचविण्यात आले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement