Published On : Fri, Aug 9th, 2019

ग्रामीण भागातील अनाधिकृत बांधकामाची चौकशी करा

स्लग-युवक काँग्रेसची मागणी,तहसीलदारांना निवेदन सादर

कामठी : ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात शहरीकरण होत असून यात अनाधिकृत बांधकामाची संख्या मोठी आहे. या बांधकाम व्यावसायिकांची चौकशी करून सामान्य नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी युवक काँग्रेस तर्फे नागपूर जिल्हा महासचिव निखिल फलके यांनी कामठी तहसीलदारांना केली आहे.

कामठी तालुक्यातील भिलगाव, मसाळा-कवठा , खैरी लगतच्या इतर गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत आहे. या शहरीकरणाचा फायदा उठवत काही भू माफीये सक्रिय झाले असून कुठलीही परवानगी न घेता प्लाॅट पाडून सर्वसामान्य नागरिकांना विकत आहे. या ले आऊटचा कुठलाही विकास करण्यात येत नाही. तसेच परिसरात डुपलेक्स, रो हाऊस व फ्लॅटचे सुध्दा मोठ्या प्रमाणात बांधकाम करण्यात येत असून यामध्ये सुध्दा मुलभूत सुविधेचा अभाव आहे. मात्र संबंधित ग्रामपंचायत व स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करून भूमाफियांसोबत साठगाठ करुन मोठ्या प्रमाणात रजिस्टरी लावत आहेत. हा संपूर्ण प्रकार अत्यंत संशयास्पद आहे.

अनेकांनी गावठाण जमीनची सुध्दा विक्री करुन सर्वसामान्य नागरिकांच्या घामाचा पैसा गडप केला आहे. तालुक्यातील या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी युवक काँग्रेसतर्फे कामठी तहसीलदार अरविंद हिंगे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव निखिल फलके, शिक्षक नेते खिमेश बढिये, भिलगावचे माजी उपसरपंच चंद्रकांत फलके , कवठा-म्हसाळाचे माजी सदस्य धर्मराज आहाके, कवठा-म्हसाळाचे सरपंच शरद माकडे, खैरीचे माजी सरपंच किशोर धांडे, योगेश ढोकणे, राजेश अहीर, अनिकेत शेळके, रुपेश मानकर,सचिन चौधरी यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी