Published On : Fri, Aug 9th, 2019

खैरी येथे सरकारी स्वस्त धान्य दुकानातून सडलेल्या गव्हाचा पुरवठा

Advertisement

सरपंच मोरेश्वर कापसे यांनी केली जिल्हाधिकारी कडे तक्रार

संबंधितावर त्वरित कारवाई करण्याची केली मागणी

कामठी : तालुक्यातील खैरी येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानातून सडलेल्या गावाचा वाटप होत असल्याची तक्रार नागरिकांनी सरपंच मोरेश्वर कापसे यांच्याकडे केली असता कापसे यांनी दुकानात जाऊन सडलेल्या गव्हाचे नमुने घेऊन जिल्हाधिकारी कडे तक्रार केली असून संबंधितांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे

खैरी येथील सरकारी स्वस्त धान्य दुकान आज सकाळी 10 वाजतासुमारास दुकानदार जयस्वाल यांनी धान्याचे वितरण करायला सुरुवात केली असता गहू वाटप करताना काही नागरिकांच्या लक्षात आले की गहू पाण्यात भिजले व सडलेले असून गाव्हाची घाण वास येत असल्याची तक्रार नागरिकांनी दुकानदाराकडे केली असता दुकानदार यांनी सडलेले गहू तुम्हाला घ्यावे लागणार नाही

तर धान्य मिळणार नाही असे बोलताच नागरिकांनी त्वरित खैरीचे सरपंच मोरेश्वर कापसे यांच्याकडे सडलेल्या गाव्हाबद्दल तक्रार केली असता सरपंच कापसे यांनी दुकानात जाऊन धान्याच्या साठ्याची तपासणी केली असता गहू हे सडलेले असून त्या गव्हाची घाणेरडी वास येत असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी गव्हाचे नमुने घेऊन जिल्हाधिकारी अश्विन मुद् गल यांच्याकडे तक्रार केली असून सडलेल्या गव्हाचा पुरवठा करणाऱ्या दुकान मालक व संबंधितावर त्वरित कडक कारवाई करण्याची मागणी सरपंच मोरेश्वर कापसे, उपसरपंच विना रक्ताटे ,ग्रामपंचायत सदस्य दिलीप ठाकरे ,विजया शेंडे, प्रीती मानकर, सुजाता डोंगरे ,छाया कानफडे व गावकऱ्यांनी केली आहे

संदीप कांबळे कामठी