Published On : Fri, Aug 9th, 2019

नवीन पाणीपुरवठा योजना रामटेकसाठी जीवनदायी ठरणार : पालकमंत्री

Advertisement

नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

नागपूर: रामटेक येथील पाणीपुरवठा योजना ही अत्यंत जुनी असून या योजनेमार्फत संपूर्ण शहराला पाणीपुरवठा होऊ शकत नाही. यापूर्वी नागरिकांनी माझ्याकडे या संदर्भात तक्रारी केल्या. त्यावेळी मी आश्वासन दिले होते. ते आश्वासन आज पूर्ण करीत नवीन पाणीपुरवठा योजना रामटेक शहरासाठी केली जात आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रामटेक येथे केले.

Gold Rate
13 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,41,000/-
Gold 22 KT ₹ 1,31,100 /-
Silver/Kg ₹ 2,64,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नवीन पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर खा. कृपाल तुमाने, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, नगराध्यक्ष दिलीप देशमुख, उपाध्यक्ष शिल्पाताई रणदिवे, भाजप नेते विकास तोतडे, विवेक तोतडे, अरविंद गजभिये, किशोर रेवतकर, संजय मुलमुले, अविनाश खळतकर, संजय टेकाडे, सौ. वनमाला चौरागडे, लता कामडे, अलोक मानकर, सभापती अनिल कोल्हे, कन्हान नगराध्यक्ष शंकर चहांदे, योगेश वाडीभस्मे, मुख्याधिकारी स्वरुप खारगे आदी मान्यवर उपस्थित होते.

शासनाच्या महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान योजनेंअंतर्गत या नवीन पाणीपुरवठा योजनेला मान्यता दिली आहे. ही योजना रामटेकसाठी जीवनदायी ठरणार असल्याचेही पालकमंत्री बावनकुळे म्हणाले. रामतलाई धार्मिक मैदान येथे आज या योजनेचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

खासदार कृपाल तुमाने यावेळी बोलताना म्हणाले- पालकमंत्री बावनकुळे आल्यापासून निधीची कमी नाही. तसेच आमदार रेड्डी आणि आशिष जयस्वाल मिळून काम करीत आहेत. त्यामुळे रामटेकचा विकास आता झाल्याशिवाय राहणार नाही. आ. मल्लिकार्जुन रेड्डी यांनीही आपल्या कामाचा आढावा घेणारे व शासनाच्या योजनांची माहिती देणारे भाषण यावेळी केले.

सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन
नारायण टेकडी येथे जाणार्‍या सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते रामटेक येथे झाले. यावेळी खा. कृपाल तुमाने, आ. मल्लिकार्जुन रेड्ी, व अन्य मान्यवर उपस्थित होते. उपविभागीय कार्यालय येथे शेतकरी पीक कर्जाचे आणि पट्टे वाटप, अन्नाभाऊ साठे जयंती निमित्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पुस्तके व गणवेश वाटप आदी कार्यक्रम पालकमंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडले.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement