Published On : Fri, Sep 20th, 2019

ग्रामीण विकास विद्यालय सालवा खो -खो तालुका क्रिडा स्पर्धेत विजयी

कन्हान : – जिल्हा क्रिडा परिषद नागपूर व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय नागपुर व्दारे क्रिडा संकुल मौदा येथे झालेल्या पावसाळी तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धेत ग्रामीण विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सालवा खो, खो मध्ये प्रथम क्रमांक पटकावुन जिल्हा स्तरावर प्रवेश निश्चित केला.

Advertisement

महाराष्ट्र शासनाच्या क्रिडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा परिषद नागपुर व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय नागपुर व्दारे सन २०१९ – २० या शैक्षणिक वर्षात पावसा ळी तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा क्रिडा संकुल मौदा येथे घेण्यात आल्या यात ग्रामीण विकास विद्यालय व कनिष्ठ महा विद्यालय सालवा च्या विद्यार्थी खेडाळु संघाने खो, खो मुले १४ व १७ वयोगटात विजय प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावुन जिल्हा स्तरावर प्रवेश निश्चित केला. या यशाबद्दल संघाने आपल्या यशाचे श्रेय क्रिडा शिक्षक श्री डी बी सुळके सरांना दिले.

Advertisement

खो – खो मुले १४ व १७ वयोगटात तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला बद्दल यशस्वी विद्यार्थी खेडाळु संघाचे व क्रिडा शिक्षकांचे संस्था सचिव मा विजयराव कठाळकर, शाळेचे मुख्याध्यापक आर आर मोटघरे , पर्यवेक्षक एस आर पेंदाम व सर्व शिक्षक वृंदानी अभिनंदन करून पुढील वाट चालीस शुभेच्छा दिल्या.

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement