Published On : Sat, Mar 31st, 2018

दहेगाव (रंगारी) ग्रामपंचायतचा ग्रामविकास अधिकारी बेपत्ता

File Pic


खापरखेडा: राजकारणामुळे बळी पडलेल्या दहेगाव (रंगारी) गावातील ग्रामविकास अधिकारी बेपत्ता आहे विज, पाणी, निवारा हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे मात्र विजेचे बिल थकीत असल्यामुळे महावितरण कंपनीने चार दिवसापूर्वी वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे गावात पाण्याचा हाहाकार माजला असून पाण्यासाठी नागरिकांची सारखी भटंगती सुरू आहे.

मात्र संबंधित प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे दहेगाव ग्रा.पं. च्या सार्वत्रिक निवडणुका 2013 साली झाल्या असून 7 हजार 812 इतकी लोकसंख्या आहे याठिकाणी एकूण 5 वार्ड आहेत सदर ग्रा.प.वर राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या सरपंचां अर्चना किशोर चोधरी विराजमान आहेत जिल्ह्यातील अनेक ग्रा.पं. कडे महावितरण कंपनीचे विजेचे बिल थकीत आहेत त्यामुळे सदर ग्रा.पं. प्रशासनाला चार टप्पे पाडून देण्यात आले होते दहेगाव (रंगारी) ग्रा.पं. मागील एका वर्षा पासून विजेचे बिल थकीत आहे शासनाच्या योजने नुसार सदर ग्रा.पं.प्रशासनाने विजेच्या बिलाचे दोन टप्पे भरले आहेत.

मात्र मधल्या काळात सदर ग्रा.पं.कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी दीर्घकालीन सुट्टीवर गेले आहेत तेव्हा पासून सदर ग्रा.प.रामभरोसे असून पूर्णपणे विकास खोळंबला आहे ग्रा.पं.संपूर्ण आर्थिक कारभार सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या संयुक्त सहीनिशी चालतो तेव्हा आर्थिक व्यवहार चालणार कसा? उन्हाळ्याचे दिवस आणि त्यात 1 लाख 59 हजार 600 रुपये महावितरण कंपनीचे शिल्लक असल्यामुळे सदर कंपनीने वीज पुरवठा खंडित केला आहे 90 हजार रुपये पाणी पुरवठा, स्ट्रीट लाईट बिल 60 हजार व कार्यालयीन बिल 600 रुपये शिल्लक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Gold Rate
22 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,11,200 /-
Gold 22 KT ₹ 1,03,400 /-
Silver/Kg ₹ 1,33,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

येथील ग्रामविकास अधिकारी दिर्घकालीन सुट्टीवर असल्याची कल्पना आहे यासंदर्भात संबंधित विभागाला कळविण्यात आले आहे सदर ग्रा.पं. सावनेर पं.स.अंतर्गत येत असून कर्तव्यावर ग्रामविकास अधिकारी उपलब्ध करून देणे येथील गट विकास अधिकाऱ्याची जबाबदारी आहे मात्र संबंधित अधिकारी राजकीय दबावाखाली मौन पाळून आहेत सदर ग्रा.पं.पैसा आहे मात्र आर्थिक व्यवहार करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी नाही त्यामुळे विजेचे बिल भरण्यास अडथळा निर्माण होत असल्याची माहिती सरपंच अर्चना चोधरी यांनी दिली हँडपंप, विहिरीतुन नागरिक पाणी घेत असून काही नागरिक टँकरने पाणीपुरवठा करीत आहे मात्र संबंधित प्रशासनाने हात वर केले आहे यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ता अनिल पुरी यांनी नागरिकांचा त्रास लक्षात घेता त्वरित पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे.

Advertisement
Advertisement