नवी दिल्ली- काँग्रेस पक्षाने सोमवार (२ जून) रोजी एक गंभीर आरोप करत म्हटले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) ने २०१४ नंतरपासून देशातील व्यावसायिक व शैक्षणिक संस्थांमध्ये योजनाबद्ध शिरकाव (infiltration) सुरू केला असून, या संस्थांचा ऱ्हास केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसने भारतीय ऐतिहासिक अनुसंधान परिषद (ICHR) मध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराचा संदर्भ देत संघाशी संबंधित कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
काँग्रेसचे सरचिटणीस आणि माध्यम प्रमुख जयराम रमेश म्हणाले, मे २०१४ पासून संघाने व्यावसायिक संस्थांमध्ये शिरकाव करण्याची योजना आखली आहे. याचे एक स्पष्ट उदाहरण म्हणजे ICHR. आता या कार्यकर्त्यांवर थेट केंद्रीय सतर्कता आयोग (CVC) नेच आर्थिक अपप्रवृत्तींसाठी कारवाईची शिफारस केली आहे. १४ कोटी रुपयांचा हा घोटाळा ICHR साठी मोठा आहे.
ABISY केंद्रस्थानी-
रमेश यांनी सांगितले की, या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी RSS चे एक सहकार्य करणारे संघटन म्हणजे अखिल भारतीय इतिहास संकलन योजना (ABISY) आहे. याच संघटनेशी संबंधित अनेक व्यक्ती ICHR मध्ये महत्त्वाच्या पदांवर नियुक्त करण्यात आल्या होत्या.
त्यांनी पुढे आरोप केला की, ICHR एकटेच नाही, देशातील अनेक नामांकित संस्था आणि विद्यापीठे संघ समर्थकांच्या माध्यमातून नष्ट केली जात आहेत. यामध्ये अनेक जण अत्यंत संशयास्पद शैक्षणिक पात्रतेचे आहेत. या दर्जाहीनतेची सुरुवात अगदी सर्वोच्च स्तरापासूनच होते, याचे आपल्याला आश्चर्य वाटायला नको.”
CVC कडून तपास सुरू-
माध्यम अहवालांनुसार, CVC सध्या ICHR मधील ₹१४ कोटींच्या घोटाळ्याचा तपास करत आहे. यात ABISY च्या काही सदस्यांविरुद्ध कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये संशोधनासाठी वितरित केलेली अनुदाने, परंतु काम पूर्ण न करता रक्कम न परत करण्याचे प्रकार, तसेच संस्थेच्या निधीचा “उधळपट्टीसारखा वापर” झाल्याचा उल्लेख केला आहे. या आरोपांवर अद्याप ICHR किंवा ABISY यांच्याकडून कोणताही अधिकृत प्रतिसाद आलेला नाही.
काँग्रेस नेते काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनीही केला आरोप –
नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळाच्या तीन वर्षांनंतर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) शी संबंधित एका संस्थेच्या अनेक सदस्यांची दिल्लीतील भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषद (ICHR) मध्ये प्रमुख पदांवर नेमणूक करण्यात आली. RSS च्या अखिल भारतीय इतिहास संकलन योजना (ABISY) च्या सदस्यांची नेमणूक, संघ परिवाराच्या भारतीय इतिहासाचा “पुनर्लेखन” करण्याच्या घोषित हेतूचा भाग होती. लक्षात ठेवा, ABISY चं ऑफिस RSS च्या दिल्ली कार्यालयात स्थित आहे. RSS ने मे 2014 पासूनच व्यावसायिक संस्थांमध्ये संघटितपणे प्रवेश करण्याचं काम सुरू केलं होतं. याचं एक उदाहरण म्हणजे भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषद (ICHR).
आता, केंद्रीय सतर्कता आयोग (CVC) ने ICHR वर वित्तीय अनियमिततेसाठी आरोप केले आहेत. हा घोटाळा 14 कोटी रुपयांचा आहे, जो ICHR साठी एक मोठी रक्कम आहे. या घोटाळ्याच्या मध्यभागी RSS च्या अखिल भारतीय इतिहास संकलन योजना (ABISY) आहे. स्क्रोलच्या या रिपोर्टमध्ये याचा उघडा केला गेला आहे. नागरिक पाहू शकतात की कसं देशभरातील मोठ्या-मोठ्या विद्यापीठांमध्ये संघाशी थेट संबंधित लोकांची नेमणूक केली जात असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनीही फेसबुक वर पोस्ट करत केला आहे.