Published On : Thu, May 10th, 2018

तामिळनाडूत रजनीकांतबरोबर युती होऊ शकते

नवी दिल्ली: देशातील अनेक राज्यांमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर भाजपने आता आपला झेंडा दक्षिणेकडे वळविला आहे . त्यासाठी नव्या मित्रपक्षांचा शोधही भाजपने सुरू केलेला असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र राजकारणात नुकतंच पदार्पण केलेले दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत भाजपची युती होऊ शकते, असा दावा केला आहे.

रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर तामिळनाडूतील राजकारण ढवळून निघेल . अशातच ‘रजनीकांत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ही जोडी तामिळनाडूत सरकार स्थापन करू शकते,’ असा दावा गुरुमुर्ती यांनी केला आहे. ‘तामिळनाडूला नव्या चेहऱ्याची गरज आहे. विश्वास बसेल असा चेहरा लोकांना हवा आहे, असेही त्यांनी सांगितले .

Advertisement

रजनीकांत यांना लोकांचा मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे ते तामिळनाडूच्या राजकारणात रजनीकांत मजबूत पाय रोवू शकतात. रजनीकांत यांची जादू आणि मोदींची प्रशासकीय कुशलता या बळावर दोघेही तामिळनाडूत सरकार स्थापन करून शकतात,’ असे ते म्हणाले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement