Published On : Mon, Jan 1st, 2018

RSS ने अमित शहांना दिली वॉर्निंग, ‘2019 मध्ये बुडू शकते भाजपाची बोट’

Advertisement


नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 2019 मधील लोकसभा निवडणुकीआधी भाजपासमोर धोक्याची घंटा वाजवली आहे. शेतकरी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन भाजपाला निवडणुकीत फटका बसू शकतो अशी भीती आरएसएसने व्यक्त केली आहे. टेलीग्राफच्या रिपोर्टनुसार, लोक शेतक-यांना सामोरं जावं लागणा-या समस्या आणि नोकरीच्या मुद्यावरुन वारंवार भाजपाला चेतावणी देत आहेत असं आरएसएसशी संबंधित एका नेत्याने सांगितलं आहे. पुढे ते बोलले आहेत की, ‘जर सरकारने आमच्या बोलण्याकडे लक्ष दिलं असतं तर गुजरातमध्ये भाजपाची अशी परिस्थिती झाली नसती’.

गुजरातमध्ये भाजपाने भलेही सरकार स्थापन केले असले तरी भाजपा पक्ष आणि आरएसएस या निकालामुळे समाधानी नाहीये. गेल्या शुक्रवारी आरएसएसने गुजरातमधून मिळालेला फिडबॅक भाजपासमोर मांडला. या बैठकीत भाजपाध्यक्ष अमित शहादेखील उपस्थित होते. आरएसएसचं म्हणणं आहे की, ‘नोकरीत संधी उपलब्ध नसल्याने तरुणवर्ग सरकारवर नाराज असून, विश्वासघात झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे’.

आरएसएसच्या सुत्रांनुसार, जर भाजपाने या दोन मुद्द्यांवर काम केलं नाही तर 2019 मधील लोकसभा निवडणूक आणि 2018 मधील विधानसभा निवडणुकीत पक्षासमोर अडचणी उभ्या राहू शकतात. चुकीचं आर्थिक धोरण स्विकारल्यामुळे शेतकरी आणि तरुणांच्या अडचणी वाढत असल्याचं आरएसएसची आर्थिक शाखा स्वदेश जागरण मंचच्या एका नेत्याने सांगितलं आहे.

Gold Rate
20 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,32,200/-
Gold 22 KT ₹ 1,22,900 /-
Silver/Kg ₹ 2,03,400/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

स्वदेशी जागरण मंचने सरकारला काही सल्ले दिले आहेत. वेळेत पाऊलं उचलली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते असं त्यांनी सांगितलं आहे. मात्र जीएसटीमधील केलेल्या बदलांवर त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. हा सकारात्मक बदल असल्याचं ते बोलले आहेत. भाजपाने आरएसएसने सुचवलेल्या गोष्टींवर अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिलं आहे. तसंच शेतकरी आणि रोजगाराच्या मुद्यावर लोकांना नाराज करणार नाही असंही सांगितलं आहे.

18 डिसेंबरला गुजरात निवडणुकीचा निकाल लागला. मोदींनी गुजरात जिंकले पण, काठावरचे बहुमत मिळाल्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेच बाजीगर ठरले. गुजरातमध्ये भाजपाला १८२ पैकी जेमतेम ९९ जागा तर काँग्रेसने ८0 जागांवर यश मिळविले आहे. तिथे बहुमतासाठी ९२ जागांची गरज होती. शिवाय, काँग्रेस पक्षाच्या गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत अधिक 16 जागा मिळवल्या आहेत. भाजपाला सलग सहाव्यांदा निवडणूक जिंकण्यात यश आलेले आहे, मात्र 2012मध्ये भाजपानं 115 जागा जिंकल्या होत्या, तर यंदा संख्येत घट होऊन 99 जागांवर भाजपानं विजय मिळवला आहे. काँग्रेसनं ग्रामीण भागात चांगली कामगिरी बजावली आहे, मात्र शहरी भागांमध्ये काँग्रेसचं फारसा प्रभाव दिसून आला नाही.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement