Published On : Wed, Dec 18th, 2019

शेतकऱ्यांना ३० हजार रुपये प्रति हेक्टरप्रमाणे नुकसान भरपाई द्या: रवि राणा

Advertisement

नागपूर : अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा स्थितीत राज्य शासनाने शेतकऱ्यांना ३० हजार रुपये प्रति हेक्टर दराने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी अमरावतीचे आमदार रवि राणा यांनी केली आहे. या मागणीला घेऊन त्यांनी बुधवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर प्रदर्शनही केले.

शिवसेना-भाजप युतीचे शासन असताना शिवसेनेने मुख्यमंत्र्यांकडे सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. आज शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना केवळ २५ हजार रुपये प्रति हेक्टर दराने कजमाफी देत आहेत.

मुख्य म्हणजे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापपर्यंत मदतीची रक्कम पोहोचलेली नाही. राज्य शासन शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी का देत नाही, असा प्रश्नही या अनुषंगाने त्यांनी उपस्थित केला. सोबतच विधानसभेच्या तिसèया दिवशीही सभागृहात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर चर्चा होत नसल्याची खंत आमदार राणा यांनी व्यक्त केली.