Published On : Thu, Jul 25th, 2019

दीड महिन्याच्या नवजात बालकांना रोटा वायरस लसीकरण

कामठी:-रोटा वायरस लस ही नवजात बालकांना अतिसार व इतर रोगांपासून बचाव करते यासाठी राष्ट्रीय नागरी आरोग्य विभाग व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र नगर परिषद कामठी च्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी 11 वाजता नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात रोटा वायरस लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात दीड महिन्याच्या 24 नवजात बालकांना रोटा वायरस ची लसीकरण करण्यात आले.

या शिबिराचे उदघाटन कामठी नगर परिषद चे नगराध्यक्ष मो शाहजहा शफाअत यांच्या शुभ हस्ते एका नवजात बालकाला लसीकरण करून करण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष शाहिदा कलिम अन्सारी, माजी उपाध्यक्ष काशीनाथ प्रधान, नगरसेविका वैशाली मानवटकर, आरोग्य सभापती ममता कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ अश्विनी फुलकर, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधीकारी डॉ शबनम खाणुनी, विशाल माटे, यासह आरोग्य कर्मचारी वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते

संदीप कांबळे कामठी