Published On : Sun, Dec 8th, 2019

रास्ता बंद है तो आता कहांसे है…

Advertisement

– वैशिष्ट्यपूर्ण शैलीत सरस काव्यरचना सादर

नागपूर: सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर बोचरी टिका करीत, विविध प्रांतांमधून आलेल्या कवींनी खासदार सांस्कृतिक महोत्सवातील शनिवारची सायंकाळ नागपूरकरांसाठी संस्मरणीय केली. यावेळी, सर्वच कवींनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत सरस काव्यरचना सादर केल्या. त्यांच्या प्रस्तुतीने बèयाच ठिकाणी अंतर्मुख झालेले प्रेक्षक, काही वेळा खळखळून हसले.

या हास्य व्यंग्य कवी संमेलनात ‘तारक मेहता का उल्टा चश्माङ्क या गाजलेल्या मालिकेत तारक मेहता ही भूमिका साकारणारे शैलेश लोढा यांच्यासह दिनेश दिग्गज, प्रवीण शुक्ला, जगदीश सोलंकी, संजय झाला, मुमताज नसीम आणि नागपूरचे प्रा.मधुप पांडेय् यांनी सहभाग घेत रंगत आणली. ईश्वर देशमुख शारिरीक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर रंगलेल्या या कविसंमेलनाला रसिक नागपूरकरांनी चांगलीच गर्दी केली होती.

कार्यक्रमाला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, महापौर संदीप जोशी, माजी खासदार दत्ता मेखे, भारत विकास परिषदेचे सुरेश गुप्ता, आमदार प्रा.अनिल सोले, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माधवी खोडे आणि प्रवीण दटके यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी, महोत्सवाचे थीम साँग तयार करणारे अभिजीत जोशी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, कवी अनिल सोले यांचा तिसरा काव्यसंग्रह ‘आत्मधूनङ्क चे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
कवी दिनेश दिग्गज यांच्या ‘रास्ता बंद है तो आता कहांसे है…अगर आ जाए तो फिर जाता कहा है…तीन दिनसे बंद दारू की दुकान तो लाता कहां से हैंङ्क अशी मार्मिक टीका केली. तर प्रवीण शुक्ल यांनी, ‘केसरीने वोटरोंसे कहा, वायफाय सारे लोगों को फ्री में दूंगाङ्क अशी व्यंग्य रचना सादर करीत, स्मार्टफोनच्या व्यसनावर अलगद चिमटा काढला.


महोत्सवात आज…
खासदार सांस्कृतिक महोत्सवात ८ ते १० डिसेंबर दरम्यान, ‘मैं लताङ्क हा विशेष कार्यक्रम सादर केला जाणार आहे. भारतरत्न गानकोकीळा लता मंगेशकर यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त खास त्यांच्या सुमधुर गीतांचा हा नजराणा प्रसिद्ध गायिका महालक्ष्मी अय्यर, सुवर्णा माटेगावकर, शरयू दाते आणि गायक प्रशांत नासेरी यांच्या प्रस्तुतीतून साकारणार आहे. रविवार ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम ईश्वर देशमुख शारिरीक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर होणार असून, सोमवार ९ डिसेंबरला भेंडे ले-आऊटच्या मैदानावर तर मंगळवार १० डिसेंबरला हा कार्यक्रम वर्धमान नगरला होणार आहे. नागपुरात प्रथमच ३० वादकांसह हा कार्यक्रम होणार आहे.