उमरेड तालुक्यातील पवित्र मानल्या जाणाऱ्या नद्यात ऋषिपंचमी निमित्य अनेक भाविक स्त्रियांनी गंगा स्नान करून गंगेचे पूजन केले व नदी तीरावर असलेल्या मंदिरात पूजा अर्चना केली.
उमरेड तालुक्यात उमरेड येथे आम नदी वाहते. आम नदीच्या या तीरावर उमरेड,गावसुत,, डब्लू सी एल कॉलनी,वायगाव या गावातील अनेक स्त्रियांनी ऋषिपंचमीचे पर्व मानत गंगा स्नान करून विधिवत पूजन केले. या नदीच्या तीरावर हजार च्या वर स्त्री भाविकांनी नदीमध्ये डुबकी लावली.
तर पिपळा येथील नांद नदी वरती 400 ते 500 स्त्रियांनी गंगा स्नान केले, नागपूर जिल्ह्यात उत्तरवाहिनी नदी म्हणून प्रसिद्ध असलेली शिंगोरी येथील नदी वर दिवसभर भाविक स्त्रियांची गर्दी पहावयास मिळाली, या नदीवर तीरावर,कळमना सावंगी सडेश्वर कोहळा खुरसापार साईसर शिरशी अशा जवळपासच्या गावांमधून स्त्रियांनी येथे येऊन स्नान करत,नदीच्या मधोमध असलेल्या मंदिरात पूजा अर्चना करून चांगल्या स्वास्थ्याची व बळीराजाला बळकट होण्याची कामना केली, ही नदी उत्तर वाहिनी असल्यामुळे शास्त्रात सुद्धा या उत्तरवाहिनी नदीचे मोठे महत्व असल्याचे बोलले जाते .
म्हणून या ठिकाणी दिवसभर स्त्रियांची गर्दी होती. आमगाव देवळी या ठिकाणी आम नदी वाहत असून या ठिकाणी सुद्धा 100 च्या वर स्त्रियांनी पूजन करणे व स्नान करून ऋषिपंचमी निमित्त आपली कृतज्ञता व्यक्त केली. बेला येथील कडाजना तीर्थक्षेत्र असलेल्या वेना नदीच्या तीरावर रामचंद्र महाराजांचे मंदिर आहे त्यालाच लागून वेना नदीचा मोठा डोह आपला विस्तीर्ण आकार घेऊन उभा आहे.
या पवित्र नदीच्या पवित्र डोहाजवळ दूर दूर वरून आलेल्या भाविक स्त्रियांनी गंगा स्नान केले. येथे आलेल्या स्त्रियांनी देव तांदळाची खिचडी घरी उगवलेल्या भाजीपाल्याचा उपयोग करून ही खिचडी शिजवली जाते ह्या खिचडीचे हेच महत्त्व मांनले जाते, या खिचडीमध्ये शेतात उगवलेला भाजीपाला सहसा टाकल्या जात नाही .
आपला उपास सोडवत अनेक स्त्रियांनी नदी तीरावर असलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेतले नंतर प्रभू रामचंद्राच्या चरणी नतमस्तक होत ऋषिपंचमीचा सोहळा साजरा केला. वेदा नदी वरती नागपूर, बुटीबोरी,सोनेगाव दहेली, आष्टा, रामा, किनार माकडी, जाम,शिंधी अशा दूर गावावरून महिलांचा जमावडा झाला होता
उमरेड तालुक्यातील ह्या पवित्र नद्यात अधिक मास व श्रावणमासात अनेक भाविक भक्तांनी आंघोळी केल्या.. तसेच ऋषिपंचमीनिमित्त अनेक स्त्रियांनी उमरेड तालुक्यातील विविध नद्यांमध्ये पवित्र स्नान व उपवास करत देव तांदळाची खिचडी शिजवून ग्रहण केली. श्रावण महिन्यात मोठा महादेव, व अनेक तीर्थक्षेत्र फिरून आलेले, मयूर गंधारे, अरविंद मेंडुले, राहुल घवघवे, विकी भोयर,सुरज केने, सौरभ खोडके, वैभव गावंडे, भास्कर राऊत,अक्षय जयस्वाल, या भाविक भक्तांनी ऋषपंचमीला या नदी तीरावर कढई चा कार्यक्रम केला
अगस्त, अत्री,भारद्वाज,जमदग्नी, वशिष्ठ,,व विश्वमित्र या सप्तऋषिंन्रप्रती आदर व्यक्त करत त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत ऋषिपंचमीचा सण सर्वत्र साजरा केला जातो उमरेड तालुक्यात सुद्धा हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला.
श्रावण महिन्यात येणाऱ्या नागद्वार यात्रेदरम्यान, मोठा महादेवाची यात्रा करून परतणारे भाविक, नागद्वारच्या यात्रेनंतर ऋषिपंचमीला कढईचा कार्यक्रम करतात. , यात गोड शिरा एका मोठ्या कढईत शिजवून प्रसाद म्हणून वाटल्या जातो, विशेष म्हणजे 365 दिवसा पैकी फक्त दहा दिवस या यात्रेचा कालावधी आहे. आणि तेव्हाच ती पूर्ण केल्या जाते.
अरविंद मेंढुले
नागदार यात्रेचे भाविक भक्त
स्त्रियांच्या आयुष्यातील एक पर्व मागे जात व ऋषीमुनी बद्दल असलेला आदर या दिवशी स्त्रिया गंगा स्नान करून सन्मानाने व्यक्त करतात., येथे शिजवलेल्या भातात घरी उगवलेला भाजीपाला वापरतात. घरी उगवलेल्या भाजीपाल्यावर कीटकनाशक फवारत नसल्यामुळे ह्याचा वापर स्त्रिया करीत असल्याचे बोलले जाते.
प्राध्यापिका मालाताई दुधे .