Published On : Mon, Aug 24th, 2020

भक्तिमय वातावरनात धार्मिक तिर्थनगरी जयपाळेश्वर व लोटांगण महाराज धर्मशाळा येथे ऋषीपंचमी उत्साहात साजरी .

Advertisement

रामटेक – लोटांगण महाराज धर्मशाळा येथे ऋषी पंचमी पर्व मोठ्या दरवर्षी मोठया उत्साहात साजरा करण्यात येतं होता.परंतु ह्यावेळी कोरोना संकटामुळे गर्दी कमी होती. श्री संत गजानन महाराज समाधी सोहळा व ऋषीं पंचमी नागद्वार कढई पूजन केले.

ह्यावेळी रामलोटांगणं महाराज , धनराज बघेले, संपत वंजारी, कृष्ण पिंपरामुळे, गोपाल दलाल, रामचंद्र पडोळे ,कलावती पडोळे सुशील पडोळे , सतीश दूनेदार,उमेश पटले आदी भक्तगण यांनी को संकट मुळे घरच्या घरी च साजरा केला. ह्यावेळी श्री संत गजानन महाराज महिला भजन मंडळ व श्री गुरु माऊली भजन मंडळ यांनी भजन करुन हर्षोल्लास मध्ये भक्तिमय वातावरनात येथे ऋषीपंचमी उत्साहात साजरी केली .
दरवर्षी रामटेक व रामटेक परिसरातील धार्मिक स्थळ व मंदिराचा परिसर महिला भक्तांनी गजबजून जात होता.ऋषी पंचमी साठी दर वर्षी महिला भाविकांची गर्दी रामटेक व परिसरातील विविध ठिकाणी राहत असे

रामटेक जवळील जयपालेश्वर येथे सुनील मर्जिवे , अशोक मर्जिवे , चाफले , संजय मर्जिवे ,मिथुन मर्जीवे आदी भाविकांनी स्नान करून व त्यानंतर त्यांनी पुजा ,प्रसाद व जेवण करून नियमाचे पालन करून भक्तीमय वातावरनाचा लाभ घेतला. दरवर्षी आंबाला तलाव परिसरातही महिला भाविकांची प्रचंड प्रमाणात बघावयास मिळत होती परंतु या वर्षी सम्पूर्ण तलाव परिसर ,आजूबाजूच्या भागातील मंदिरे,धर्मशाळा येथेही भाविकांची गर्दीच नव्ह ती तरी देखील भाविकांची उत्साहाचे वातावरण पसरले होते.