Published On : Mon, Aug 24th, 2020

सोयबीन उत्पादक शेतकरी हवालदील उपासमारीचे संकट- सरोदे

– कृषी विभागाच्या नकार्तेपणामुळे वायरस चा प्रादुर्भाव

काटोल- मागच्या वर्षी कापसाच्या उत्पादनात घट व कापुसाला भाव नसल्यामुळे शेतकरी सोयाबीन या पिकांकडे वळले दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी शेतकऱ्यांनी सोयबीनचा पेरा अधीक केला सुरवतीला बहुतांश शेतकऱ्याचे सोयबीन बियाणे बोगस निघाले ते उगवले नाही त्या मध्ये त्यांची फसगत झाली कृषी विभागात तक्रार करून सुद्धा काही झाले नाही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली दुसरी कडे सुरूवातीला पावसाची सुरवात चांगली झाली सोयबिन पिकांची वाढ उत्तम होवुन फुलावर आली आता शेंगेत दाणे भरण्याची वेळ आली

Advertisement

तर येलो मोझॅक वायरस खोड किडी चा प्रादुर्भाव होवुन सोयबीन पिवळी पडत आहे कुषी विभाग गाड झोपेत आहे सततच्या पाण्यामुळे ज्या शेतकऱ्यांची शेत जमिन हलक्या व मध्यम स्वरूपाच्या आहे त्यांचा सोयबीन पिकावर परीणाम झाला शेतकरी दुहेरी संकटात सापडला सोयाबीन उत्पदन घट होणार शेतकऱ्यांवर आर्थीक संकट येणार हे निश्चित.मुर्ती येथील रूमेश्वर मुन्ने व नाना सातपुते यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी केली असता सोयाबीन वर आलेल्या रोगाने शेतकरीवर्गाचे खूप मोठया प्रमाणात नुकसान होत आहे हे निर्दशनास आले, शासन दरबारी याची दखल घेण्यात यावी, शासनाने शेतकऱ्यास मदत करावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे मत श्री संदिप सरोदे किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष यांनी सांगीतले यावेळी प्रेमकुमार गाकरे राजु भोयर हेमराज खवसे वासुदेव खवसे उपस्तित होते

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement