नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज जम्मू काश्मीरसाठीचे 370 वे कलम रद्द करण्याची घोषणा केली. केंद्र शासनाने घेतलेेला हा क्रांतिकारी निर्णय असून या निर्णयाचे आपण स्वागत करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन करीत असल्याची प्रतिक्रिया राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर वर्धाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.
या निर्णयामुळे जम्मू काश्मीरल मिळालेल्या स्वतंत्र राज्याचे दर्जा समाप्त होणार आहे. भारत एकसंध आहे.
एखादा कायद्या लागू करण्यासाठी आता तेथील राज्य शासनाची परवानगी घेण्याची आवश्यकता केंद्राला पडणार नाही, असे सांगताना पालकमंत्री बावनकुळे म्हणाले- अत्यंत मोठा निर्णय केंद्राने घेतला असून लोकांना आता तेथील नागरिकत्व घेता येईल.
खरेदी व गुंतवणुकीचे व्यवहार करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मुख्य म्हणजे हे कलम रद्द केल्यामुळे दहशतवादी कारवायांना पायबंद बसून तेथील नागरिकांना सुरक्षा प्रदान करता येणार असल्याचेही पालकमंत्री म्हणाले.