Published On : Mon, Aug 5th, 2019

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांचे मास्टर स्ट्रोक…ऍड सुलेखाताई कुंभारे

कामठी: जम्मू काश्मीर मध्ये ज्या पद्धतीने दोन वेगवेगळी नागरिकता प्रदान करण्यात आली होती, त्या राज्याचे दोन वेगवेगळे ध्वज फडकवल्या जात होते व यांना विशेष दर्जा देण्यात आला होता तरीसुद्धा जम्मू व काश्मीर मोठ्या प्रमाणात आतंकीला बळी पडला व भारतातील इतर राज्यासारखा विकास होऊ शकला नाही .

आज केंद्र सरकारने राज्यसभेत जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतला या ऐतिहासिक निर्णयाने जम्मू व कश्मीर, लद्दाख हे केंद्रशासित प्रदेश बनतील व या राज्यात आतंकवादाचा खात्मा होईल व या केंद्रशासित राज्याचा पूर्णपणे विकास होईल

या ऐतिहासिक निर्णयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांचे बहुजन रिपब्लिकन एकता मंच च्या संयोजिका व राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्यां ऍड सुलेखाताई कुंभारे यांनी खूप खूप आभार मानले

संदीप कांबळे कामठी