Published On : Mon, Aug 5th, 2019

जुनी कामठी पोलिसांनी दिले 10 गोवंश जनावरांना जीवनदान

Advertisement

कामठी: स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या भाजीमंडी ते गांधीनगर मार्गावर कत्तलीसाठी गोवंश जनावरे बांधून ठेवल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी वेळीच घटनास्थळ गाठले असता 10 गोवंश जनावरे निर्दयतेने, अमानुषपणे, नायलॉन दोरीने बांधून असल्याचे लक्षात आले याबाबत अधिक विचारपूस केले असता हे जनावरे उस्मान नावाच्या इसमाने बांधून ठेवल्याची माहिती मिळाली यावरून उस्नान नावाच्या आरोपीवर कायदेशीर गुन्हा नोंदवीत या 10 ही गोवंश जनावरांना ताब्यात घेत नजीकच्या लुंबिनी नगर येथील गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवून कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या गोवंश जनावरांना जीवनदान दिल्याची यशस्वी कारवाही आज सकाळी 12 दरम्यान करण्यात आली.

ही यशस्वी कारवाही डीसीपी निरलोत्पल , एसीपी राजेश परदेसी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नगराळे, दुययम पोलीस निरीक्षक देविदास कठाळे यांच्या मार्गदर्शनार्थ किशोर मालोकर, पिल्ले, विवेक, येशीराम, दिलीप ढगे, धर्मेंद्र राऊत,विजय भलावी, अश्विन साखरकर यानो केली असून पुढील तपास सुरू आहे.

संदीप कांबळे कामठी