Published On : Wed, Jun 26th, 2019

सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करणाऱ्यावर नासुप्र’ची कारवाई

Advertisement

नागपूर: मौजा लेंड्रा येथील नागपूर सुधार प्रन्यासच्या उत्तर अंबाझरी मार्गावरील २.९४ एकर सार्वजनिक उपयोगाच्या जागेवरील ०.५ एकर जागेचा ताबा मा. सर्वोच्च न्यायालयाचे अपील प्रकरण (सी) २७००१/-२७००२/२०१४ मधील दिनांक १८/०२/२०१९ चे आदेशान्वये दिनांक २५/०३/२०१९ रोजी नागपूर सुधार प्रन्यासतर्फे घेण्यात आला.

सदर २.९४ एकर जागा मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ला हस्तांतरित करावयाची असल्यामुळे ०.५ एकर जागेवर अस्तित्वात असलेले श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही आज दिनांक २५/०६/२०१९ रोजी करण्यात आली. संयुक्तपणे नागपूर सुधार प्रन्यास व मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या अधिकारी समवेत सुरु करण्यात आली.

Gold Rate
05 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,700 /-
Gold 22 KT ₹ 93,700/-
Silver/Kg ₹ 1,13,200/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सदर कार्यवाही दरम्यान विभागीय अधिकारी (पश्चिम) श्री अविनाश बडगे, सहाय्यक अभियंता श्रेणी-२ श्रीमती पुष्पा शहारे, स्थापत्य अभि सहाय्यक श्रीमती रूपा सोनाये, क्षतिपथक प्रमुख श्री.मनोहर पाटील आणि मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’चे अधिकारी श्री संदिप बापट, श्री चेतन किमंतकर उपस्थित होते.

Advertisement
Advertisement