नागपूर: नागपूर महानगरपालिकेचे मालमत्ता कर वसुलीचे चालु आर्थिक वर्षातील जास्तीत-जास्त उद्दीष्ट पुर्ण करण्याच्या दृष्टीने 13 मार्च पूर्वा 25 हजार पेक्षा जास्त मालमत्ता कर थकित असलेल्या मालमत्ता धारकांच्या स्थावर मालमत्ता नियमानुसार लिलाव प्रक्रिया राबवून सक्तीने वसुली करण्याचे निर्देश स्थायी समिती सभापती विरेंद्र कुकरेजा व आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिले.
यावेळी बैठकीला अपर आयुक्त् रविंद्र कुंभारे, सहा. आयुक्त् कर आकारणी मिलिंद मेश्राम सर्व झोनचे सहा. आयुक्त् सर्वश्री राजेश कराडे, प्रकाश वराडे, महेश मोरोणे, अशोक पाटील, सुभाष जयदेव, हरिष राऊत, सुवर्णा दखणे व स्मिता काळे यांचेसह मालमत्ता व स्थानिक संस्था कर विभागाचे सहा. अधीक्षक व राजस्व निरीक्षक इ. उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिकेच्या मालमत्ता व स्थानिक संस्था कर वसुलीचा आढावा घेण्यासाठी म.न.पा. च्या छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारततील सभा कक्षात आज सायंकाळी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी झोन निहाय कर वसुलीचा आढावा घेतला त्यामध्ये रुपये 25 हजार पेक्षा जास्त थकित असलेल्या 7,906 मालमत्ता कर थकबाकी दारांकडून 149 कोटी रुपयाची मालमत्ता कर थकबाकी असल्याची माहिती देण्यात आली. जास्तीत जास्त मालमत्ता कर वसुल करण्याच्या दृष्टीने सर्व झोनचे सहा. आयुक्त व निरिक्षक यांनी मालमत्ता कर वसुलीची कारवाई नियमानुसार पूर्ण करावी असे ही निर्देश बैठकीत देण्यात आले.
यावेळी स्थानिक संस्था कर वसुलीचे प्रकरणाची देखील झोन निहाय माहिती घेवून महसुल वसुली प्रमाणपत्र (RRC) तामिल झाले किंवा नाही याबाबत निर्देश देण्यात आले.
बैठकीला अति. आयुक्त रवींद्र कुंभारे, सहा. आयुक्त (कर व स्थानिक संस्था कर) मिलिंद मेश्राम, झोनचे सहा. आयुक्त् सर्वश्री महेश मोरोणे, राजेश कराडे, राजू भिवगडे, हरिष राऊत, अशोक पाटील, प्रकाश वराडे, सुभाष जयदेव,