Published On : Fri, Jan 11th, 2019

उजनी जलाशयावरील तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पासाठीच्या निविदापूर्व बैठकीला प्रतिसाद

Advertisement

नागपूर: उजनी धरणाच्या जलाशयावर १ हजार मॅ.वॅ.चा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभा करण्यासाठी निविदापूर्व बैठक महावितरण मुख्यालयाच्या प्रकाशगड, मुंबई येथे नुकतीच संपन्न झाली. देशातील अशा प्रकारचा एवढ्या मोठा क्षमतेचा हा पहिलाच प्रयोग असून सदर प्रकल्प राबविण्यासाठी निविदाधारकांनी निविदापूर्व बैठकीत प्रमाणात स्वारस्य दाखविले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या जलाशयावर तरंगते सौरऊर्जा प्रकल्प उभे करण्यासाठी महावितरण व टीसीआयएलच्या संकेतस्थळावर (https://www.tcil-india-electronictender.com) भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार व महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या मान्यतेनुसार अपारंपारिक ऊर्जा खरेदी बंधनाची पूर्तता करण्यासाठी महावितरणने दीर्घकालिन निविदा प्रक्रियेची सुरुवात केली आहे.

निवेदापूर्व बैठकीत महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार व संचालक (वाणिज्य) सतिश चव्हाण यांनी निविदाधारकांना मार्गदर्शन करुन निवेदेसंबंधातील प्रश्न व अडचणी समजून घेतल्या.

उजनी प्रकल्पाबाबत स्वतंत्र समिती स्थापन केल्याबद्दल व अभ्यासपूर्ण तसेच आयोगाची मान्यता घेऊन निविदा तयार केल्याबद्दल या बैठकीत निविदाधारकांनी समाधान व्यक्त केले आहे. बैठकीत उपस्थितीत निविदाकारांना मार्गदर्शन केल्याने विविध स्तरावरील निविदाधारक उजनी धरणासाठी अधिक स्वारस्य नोंदवितील, असा विश्वास महावितरण प्रशासनासने व्यक्त केला आहे.