Advertisement
कन्हान : – शहर विकास मंच व्दारे भारताचे दुसरे प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री यांची पुण्यतिथी कार्यक्रमासह साजरी करण्यात आली .
गांधी चौक कन्हान येथे कन्हान शहर विकास मंचचे सदस्य सचिन यादव यांच्या हस्ते लाल बहादुर शास्त्रीजी च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . याप्रसंगी मंचचे उपाध्यक्ष माधव वैद्य यांनी लाल बहादुर शास्त्री यांच्या जीवनवर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे संचालन नितिन मेश्राम यांनी तर आभार बाळा मेश्राम यांनी व्यकत केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता कन्हान शहर विकास मंचचे अध्यक्ष ऋृषभ बावनकर, दिनेश भालेकर, प्रकाश कुर्वे, मुकेश गंगराज, अक्षय फुले , सोनु मसराम, गंगाधर ढोमणे, राजेंन्द्र पचकलसिया, हरीओम नारायण, शाहरूख खान आदीने सहकार्य केले .