स्वच्छता बाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आज दिनांक 12 जानेवारी 2019 रोजी नागपूर शहरात स्वच्छता जनजागृती महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या महारॅलीस नागपूर शहरातील 100 शाळा सहभागी होणार असून मुख्य रॅली पं. बच्छराज व्यास विदयालय व कनिष्ठ महाविदयालय, राजाबाक्षा, मेडिकल चौक येथे आयोजित आहे.
केन्द्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणा-या फिल्ड आऊटरिच ब्यूरो नागपूर तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाच्या सहकार्याने ही स्वच्छतेची महारॅली नागपूर येथे आयोजित आहे. सोबतच अशा प्रकारच्या महारॅली महाराष्ट्रातील 29 महानगर पालिका क्षेत्रात एकाच वेळी आयोजन करण्यात आले आहे. या महारॅलीमध्ये राज्यातील सुमारे 2900 शाळातील 5 लाख विदयार्थ्यी सहभागी होणार असून सुमारे 1 कोटी विदयार्थी स्वच्छतेची शपथ घेणार आहे.
नागपूर येथे आयोजित स्वच्छता महारॅलीत शहरातील शाळा आप-आपल्या शाळेतून सकाळी रॅली काढणार आहे. तसेच परिसरात स्वच्छता आणि स्वच्छतेची शपथ सुद्धा विदयार्थी घेणार आहे.
पं. बच्छराज व्यास विदयालयात होणा-या मुख्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते रॅलीत झेंडा दाखविला जाणार आहे. यावेळी आमदार गिरीष व्यास तसेच आमदार ना.गो. गाणार उपस्थित राहणार असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना जोशी यांनी दिली. या रॅलीचे यशस्वी करण्यासाठी शिक्षण उपसंचालक सतिश मेंढे, फिल्ड आऊटरिच ब्यूरोचे क्षेत्रिय प्रचार अधिकारी डॉ. मनोज सोनोने प्रयत्नशिल आहेत.
या महारॅली पूर्वी काल दिनांक 11 जानेवारी रोजी शहरातील निवडक 100 शाळांमध्ये स्वच्छतेचा संदेश देणारी चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या चित्रकला स्पर्धेत मोठया संख्येने विदयार्थी सहभागी झाले होते.
