Published On : Thu, Apr 16th, 2020

सफाई कामगारांचा सत्कार

कामठी :-सफाई कामगार हे नेहमी लोकांच्या तिरस्काराचा विषय असतात .शहरात सर्वत्र कोरोना विषाणूचा भय असतानाही स्वतःचा जीव धोक्यात घालुन शहरात काम करणारा सफाई कामगार समाजापासून वंचित राहिलेला घटक आहे मात्र आजच्या स्थितीत सफाई कामगारांचे करीत असलेले त्यांचे कार्य समाजाला बरेच काही सांगून जात आहे तेव्हा अशा वंचित व दुर्लक्षितांचे कैवारी परमपूज्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंती निमित्त आजच्या कोरोना विषाणू प्रदूर्भावाच्या बिकट परिस्थितीत सफाई कामातून समाजासाठी काम करणाऱ्या या सैनिकांना मानाचा मुजरा असल्याचे मनोगत प्रभाग क्र 14 चे नगरसेवक लालसिंग यादव यांनी व्यक्त केले .याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष व नगरसेवक संजय कनोजिया, उज्वल रायबोले,सतीश जैस्वाल, कास्त्री गुरुजी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विशेष बुद्ध वंदना घेत सोशल डिस्टिंग चा नियम पाळीत कामठी नगर परिषद च्या सफाई कामगारांचा हार घालून सत्कार करीत कृतज्ञता वाहण्यात आली तसेच सफाई कामगारांचे टाळ्या वाजवून आभार मानले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नोयंत्रणात आणण्यासाठी लागू असलेल्या या लॉकडॉऊन च्या लढाईत पोलीस, डॉक्टर, नर्स, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका , महसूल विभाग, नगर परिषद प्रशासन तसेच शासकीय अधिकारी व पदाधिकारी हे मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरून काम करीत त्यांच्याबद्दल ही कृतज्ञता व्यक्त करीत समस्त प्रशासनाचे आभार मानण्यात आले.

संदीप कांबळे कामठी