Published On : Thu, Apr 16th, 2020

हे कसले सोशल डीस्टन्सिंग….

Advertisement

कोरोनाचे प्रादुर्भाव संपूर्ण जगावर कोसळले आहे.

सर्वत्र लॉकडाऊन झाले आहे. कोरोना विषाणू संसर्ग होण्यापासून वाचवण्यासाठी गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे.
कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून प्रशासनातर्फे पुरेपूर प्रयत्न करण्यात येत आहेत. पोलीस ,महसूल आसनी शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग कोरोनाच्या बचावासाठी प्रयत्न करीत आहेत. पण वारंवार सांगूनही जनता सर्व सुचनांकडे दुर्लक्ष करून बेताल वागत आहेत.गरजा सर्वांच्याच आहेत पण संयमही गरजेचा आहे.दूसरीकडे कित्येक ठिकाणी सोशल डीस्टन्सिंगचा

फज्जा होत असुन प्रशासकिय आदेशाची पायमल्ली करीत असल्याचे चित्र निदर्शनास आले. ही बाब धोकादायक ठरत असल्याने नागरिकांनी कुठेही गर्दी करू नये किंवा किमान एक मीटर अंतर ठेवावे असे आवाहन आरोग्य, पोलिस , महसुल विभाग करित आहे. तरीदेखिल सोशल डीस्टन्सिंगचा फज्जा होत असुन गंभीर बाबीवर दुर्लक्ष का ? हे कसले सोशल डीस्टन्सिंग ? याला जबाबदार कोण हा यक्ष प्रश्न जागरुक नागरिक करीत आहेत.
.

भर उन्हात ग्राहकांना उभे राहावे लागत आहे.
देशात कोरोनाचे संकट असताना मोठ्या संकटचा सामना करावे लागेल .त्यामुळे बँक प्रशासन सब्जी मंडी तसेच इतर ठिकाणी ग्राहकांच्या जीवाशी खेळत तर नाही आहे असा प्रश्न समोर आला आहे. तहसिल मार्केट रोडवर ग्राहकातर्फे प्रशासकीय आदेशाची पायमल्ली करनार्या तसेच जीवाशी खेळ करनाऱ्या वर कारवाई करन्याची मागनी जोर पकडत आहे.