Published On : Mon, Aug 19th, 2019

विधानसभा निवडणुकीत उत्तर भारतीयांना प्रतिनिधित्व द्या

Advertisement

भाजपा उत्तर भारतीय मोर्चा कार्यकर्ता स्नेह संमेलनात एकमुखी मागणी

संपूर्ण राज्यात मतांची टक्केवारी बघता हिंदी भाषिक समाजाची भूमिका निर्णायक राहिली आहे नागपूर जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 12 मतदार संघ आहेत मात्र प्रतिनिधित्व मिळत नसल्याने हिंदी भाषिक समाजाच्या समस्या कायम आहेत तेव्हा कमीत कमी तीन जगावर प्रतिनिधित्व देण्याची मागणी वरिष्ठांकडे करण्यात यावी

या संदर्भातील मागणी हॉटेल सनराईज येथे झालेल्या भाजपा उत्तर भारतीय मोर्चा कार्यकर्ता स्नेह संमेलना दरम्यान एकमुखी मागणी करण्यात आली 18 आगस्ट रविवारला हॉटेल सनराईज दहेगाव (रंगारी) येथे भाजपा उत्तर भारतीय मोर्चा पूर्व विदर्भ विभागाच्या वतीने कार्यकर्ता स्नेह संमेलनाचे आयोजित करण्यात आले होते यावेळी विदर्भातून हजारोच्या संख्येत कार्यकर्ता सामील झाले होते कार्यक्रमाला आ गिरीश व्यास, देवेशचंद्र ठाकूर (विधान परिषद सदस्य बिहार) उत्तर भारतीय मोर्चा प्रदेश अध्यक्ष जयप्रकाश ठाकूर, मुख्य आयोजक व प्रदेश उपाध्यक्ष अरुण सिंह, जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार, प्रसिद्ध भोजपुरी गायक छैला बिहारी,वरिष्ठ पार्षद दयाशंकर तिवारी, माजी जि. प.अध्यक्ष अशोक धोटे, अर्जुनसिंह ठाकूर यांच्यासह श्रीराम सेना जिल्हाध्यक्ष कमलेशसिह ठाकूर, हिंदी भाषी सेना अध्यक्ष मनोज सिह, विवेकानंद झा, गुलाबसिह बघेल, विनोद सिंह, जिरमानंद झा, रमाकांत ठाकूर, प्रदम शुक्ला यांची प्रमुख उपस्थिती होती भाजपा उत्तर भारतीय मोर्चा कार्यकर्ता स्नेह संमेलन दोन सत्रात झाले पहिल्या सत्रात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रितसर उदघाटन करण्यात आले

तर दुसऱ्या सत्रात हिंदी भाषिक समाजाच्या विविध समस्यावर विस्तृत चर्चा करण्यात आली मागील अनेक वर्षांपासून हिंदी भाषिक समाज भाजप सोबत जुळला असून इमान-इतबारे समाजाने आपली भूमिका बजावली आहे नागपूर जिल्ह्यात 12 मतदार संघ आहेत यातील काही मतदार संघात उत्तर भारतीय मोर्चाला प्रतिनिधित्व मिळावे यासाठी वरिष्ठ पातळीवर उत्तर भारतीय मोर्चाच्या नेत्यांनी प्रयत्न करावेत अशी स्पष्ट मागणी करण्यात आली यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला तर हिंदी भाषिक समाजात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या बांधवांचा सत्कार करण्यात आला उत्तर भारतीय मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व आयोजक अरुण सिंह यांची हिंदी भाषिक समाजावर पकड आहे

त्यांच्या प्रयत्नाने संघटन मजबूत झाले आहे अलीकडे उत्तर भारतीय मोर्चाचे उमदा नेतृत्व म्हणून अरुण सिंह यांच्याकडे बघितले जात असून त्यांच्या कार्याची प्रशंसा मंचावर उपस्थित अनेक नेत्यांनी केली स्नेह संमेलन कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण सुप्रसिद्ध भोजपुरी गायक छैला बिहारी यांनी एका पेक्षा एक भोजपुरी, बिहारी गीत प्रस्तुत केले उत्तर भारतीय मोर्चाच्या वतीने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नागपूर शहर व ग्रामिण मध्ये प्रतिनिधित्व देण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण सिंह तर संचालन ऋषिकेश ठाकूर यांनी केले