Published On : Mon, Aug 19th, 2019

पचमढी च्या महादेवास लकेश माहतो व्दारे २३ फिटाची मोठी राखी अर्पण

कन्हान : – परिवाराच्या आणि शहरा तील नागरिकांच्या सुख, शांती व वैभव शाली जिवनाच्या मनोकामना पुर्ण करण्यात करिता लकेश माहतो परिवार व्दारे कन्हान शहरातुन २३ फिट लांब मोठी राखी नेऊन पचमढी चौरागड च्या शिव शंकर महादेवास रक्षाबंधनाच्या दिवसी बांधुन अर्पण करण्यात आली.

रायनगर कन्हान येथील रहिवासी लकेश माहतो परिवारा व्दारे स्वत:च्या परिवाराच्या आणि शहरातील नागरिकां च्या जिवनात सुख, शांती व वैभव प्राप्त होण्याच्या मनोकामने सह वर्ष २०११ ला स्वत: १५ फिट लांब मोठी राखी बनवुन मध्य प्रदेशातील पचमढीला नेऊन चौरा गडा वरील भोळा शिव शंकर महादेवास रक्षाबंधनाच्या दिवसी बांधण्यात आली. तेव्हा पासुन दरवर्षी एक फिट वाढती मोठी राखी बनवुन नेऊन बांधण्यात येत आहे.

त्या नुसार लकेश माहतो परिवारा व्दारे ९ व्या वर्षी २३ फिट लांब मोठी राखी बनवुन बुधवार दि.१४ ऑगस्ट ला सकाळी कन्हान वरून निघुन गुरुवार दि १५ ऑगस्ट स्वातंत्र दिन व राखीच्या दिवसी सकाळी १० वाजता २३ फिटाची लांब राखी पचमढीच्या चौरा गडावरील महादेवास अर्पण करण्यात आली.

परिवाराच्या व शहरवासीयांच्या उज्वल भविष्या करिता ३१ फिटाची लांब मोठी राखी अर्पण करे पर्यंत दरवर्षी हा उपक्रम वाबविण्याची मनशा त्यांनी व्यकत केली आहे. यावर्षी लकेश माहतो यांना साई माहतो, गुनक्षा भिमटे यांनी विशेष सहकार्य केले आहे.