Published On : Mon, Jun 15th, 2026
By Nagpur Today Nagpur News

अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा; १४.५८ कोटींची मदत जाहीर

Advertisement

मुंबई : अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे मोठे नुकसान सहन कराव्या लागलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या पावसामुळे बाधित झालेल्या १६,२६७ शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी १४ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असून, लाभार्थ्यांना कोणत्याही मध्यस्थांशिवाय मदत मिळणार आहे. यासाठी डीबीटी प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर प्रशासनाने केलेल्या पाहणी आणि पंचनाम्यांच्या आधारे मदतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्याला आता मंजुरी मिळाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

मदत व पुनर्वसन विभागाने मदत वितरणाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या असून, पात्र लाभार्थ्यांची माहिती ऑनलाइन प्रणालीमध्ये अद्ययावत करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे नैसर्गिक संकटाचा फटका बसलेल्या हजारो शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.