Advertisement
कामठी :-कामठी तालुक्यातील सोनेगाव राजा हे गाव कन्हान नदीच्या काठावर असल्याने दरवर्षी पुर परीस्थिती निर्माण होते त्यामुळे गावाचे उर्वरित राहिलेले पुनर्वसन तात्काळ करण्यात यावे या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष कामठी विधानसभा च्या वतीने मुंठण करून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
जोपर्यंत निर्णय होतं नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असे मत विधानसभा प्रमुख छत्रपाल करडभाजने यांनी व्यक्त केले.
यावेळी कामठी तालुका प्रमुख पंकज ढोरे, नागपूर शहर प्रमुख राजेश बोढारे, तालुका उपप्रमुख श्रीकांत ठाकरे, नकुल गमे, शुभम उघडे, सोशल मीडिया प्रमुख कार्तिक भिसेकर, वृषभ अटारकर, रमेश पारधी, शुभम धावडे, पंकज ढोबळे व संपूर्ण गावकरी उपस्थित होते.
Advertisement