Published On : Thu, Sep 27th, 2018

महावितरणच्या प्रादेशिक संचालकांनी दोन दिवसात गडचिरोली जिल्हा पिंजून काढ़ला

Advertisement

नागपूर :-ऊर्जा क्रांतीचे प्रतिक ठरणाऱ्या सौभाग्य योजनेमुळे देशातील प्रत्येक घरांना वीज जोडणी देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजना – सौभाग्य’ ला यशस्वी करण्यासाठी येत्या 15 ऑक्टोंबर पर्यत गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक संभाव्य लाभार्थ्यांना वीज जोडणी देण्याचे निर्देश महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक, भालचंद्र खंडाईत यांनी दिले आहेत.

ह्या योजनेच्या यशस्वीतेसाठी प्रादेशिक संचालकांनी मागिल दोन दिवसांत संपूर्ण गडचिरोली जिल्हा पिंजून काढित जिल्ह्याच्या कानाकोप-यातील दुर्गम भागांना भेटी देत वीज जोडणीच्या संभाव्य कामांची पाहणी करून संबंधित अधिका-यांना याबाबत दिशानिर्देश दिले आहेत.

प्रादेशिक संचालक यांच्या नेतृत्वात नागपूर प्रादेशिक कार्यालयातील वरिष्ठ अधिका-यांसमवेत चंद्रपूर परिमंडल आणि गडचिरिली मंडलातील काही निवडक अधिका-यांनी मंगळवार आणि बुधवारी जिल्ह्यात सर्वत्र भेटी देत तेथे सुरु असलेल्या सौभाग्य योजनेच्या कामांची पाहणी केली, तेथील गावक-यांशी आणि संबंधित अधिका-यांशी संवाधही साधला. येत्या 15 ऑक्टोबर पर्यंत जिल्ह्यातील सर्व संभाव्य लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यासाठी एका विशेष कृती पथकाची स्थापना करण्यात आली आहे. सोबतच प्रादेशिक स्तरावरही एका विशेष समितीचे गठन करण्यात आले असून ही समिती गडचिरोली जिह्यात होणा-या सौभाग्य योजनेच्या दैनंदिन कामांचा आढावा घेणार आहे.

सौभाग्य योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील ऊर्वरीत वीज जोडण्या देण्यात येत असलेल्या अडचणींवर मार्ग काढून नियोजित वेळात ही कामे पुर्ण व्हावीत याअनुषंगाने त्यांचे नियोजनही सर्व संबंधित अधिका-यांसोबत घेतलेल्या बैठकीचे वेळी करण्यात आले असून ही कामे वेळीच पुर्ण करण्यासाठी स्थानिक कंत्राटदारांचा ही कामे वाटपात समावेश करण्याच्या सुचनाही यावेळी देण्यात आल्या.

देशाच्या ऊर्जा क्रांतीचे प्रतिक ठरणाऱ्या सौभाग्य योजनेमुळे प्रत्येक घरांना वीज जोडणी देण्यात येत आहे, या योजनेअंतर्गत ज्या गावात अद्याप वीज पोहचली नाही, तेथे वीज पोहचविण्याचे काम गतीने सुरु आहे. त्यासाठी विद्युत वितरण यंत्रणेचे सक्षमीकरण केले जात आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार हे स्वत: प्रयत्नरत असून राज्यातील अतिदुर्गम असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक घरात वीज पोहचावी यासाठी महावितरण युद्धस्तरावर कार्यरत आहे.

यावेळी प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्यासमवेत महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर, गडचिरोली मंडलाचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे, गडचिरोली मंडल आणि नागपूर प्रादेशिक कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते