सिताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन दरम्यान प्रवासी सेवा बंद असण्याबाबत
नागपूर – छत्रपती मेट्रो स्टेशन येथील प्रस्तावित बांधाकामा करीता ऑरेंज मार्गिकेवरील (रिच – १) सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन दरम्यान प्रवासी सेवा येत्या १ जानेवारी २०२१ (शुक्रवार) रोजी बंद असेल. प्रवासी सेवा २ जानेवारी २०२१ (शनिवार) रोजी पूर्ववत सुरु होईल.
तसेच याच म्हणजे ऑरेंज मार्गिकेवरील (रिच – १) सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन दरम्यान प्रवासी सेवा येते तीन गुरुवार – म्हणजे ७, १४ आणि २१ जानेवारी २०२१ (गुरुवार) रोजी बांधकामा निमित्त बंद असेल. प्रवासी सेवा ८, १५ आणि २२ जानेवारी २०२१ (शुक्रवार) रोजी पूर्ववत सुरु होईल.
स्टेशनचे बांधकाम नियोजित वेळेवर पूर्ण होण्याकरिता प्रवासी सेवा बंद ठेवण्यात येणार असून, प्रवाश्यांना होणाऱ्या त्रासाकरता महा मेट्रो दिलगीर आहे.